आपलं शहर

मुंबईतील ३ जैन मंदिरं सुरू; सिध्दीविनायक कधी सुरू होणार?

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी श्री पार्श्वतीलक श्वेतांबर मूर्तिपुजक जैन ट्रस्टला पर्युषण उत्सव दरम्यान जैन मंदिरे खुली ठेवण्यास परवानगी दिली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या मानक कार्यप्रणालीचे अनुसरण करून पर्युषण उत्सव दरम्यान जैन मंदिरे खुली ठेवण्यास ही परवानगी दिली आहे. देशभरातील जैन मंदीरे आज आणि उद्या (दि. 22 आणि 23 ऑगस्ट रोजी) उघडण्यात येणार आहेत.

हा आदेश पूर्वनिर्धारीत म्हणून वापरता येणार नाही आणि इतर मंदिर किंवा सणांना लागू होणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे फक्त मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर या ठिकाणी असलेल्या जैन मंदिरांना उघडण्याची कायदेशीर परवाणगी देण्यात आली आहे.

मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने मंदिराच्या ट्रस्टला मानक ऑपरेटिंग कार्यपद्धती (एसओपी) पाळण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे इतर कोणत्याही विश्वस्त किंवा मंदिरावर या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीचा उल्लेख यामध्ये प्रामुख्याने करण्यात आला आहे.

यामुळे अनेक गणेश भक्तांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. गणेश चतुर्थी हा हिंदू सणातील प्रमूख सण माणला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सणासाठी अनेक नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी असेलेली गणेश मंदिरेही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली असल्याने अनेक भक्त नाराज झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईतील ३ जैन मंदिरं सुरू करण्याची परवाणगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे तर सिध्दीविनायक मंदिर कधीपासून सुरू होणार, असा सवाल सगळीकडे विचारला जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments