फेमस

स्मिता झगडे : नोकरी गेल्यानंतर टॅक्सी चालवण्यास सुरूवात करणारी पहिली महिला…

लॉकडाऊन लागू केल्यानंतर तुम्ही काम करत असलेल्या कंपनीने फक्त त्या महिन्याचा पगार दिला असेल आणि तेथुनपासून आतापर्यंत संपुर्ण पगार बंद केला असेल. अशी घटना तुमच्या बाबतीतही घडली असेल. काहींचा कंपनीमध्ये जॉब टिकून आहे, पण जोपर्यंत कंपनी सुरू होणार नाही, तोपर्यंत कामगारांना पगार मिळणार नाही, असा फतवा अनेक कंपन्यांनी काढला असेल, तर काहींनी थेट कामगार कपातीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या या लॉकडाऊनमध्ये गेल्या आहेत. (संपुर्ण देशात नोकरी जाणाऱ्यांचा आकडा 50 लाखांच्या वर असल्याची माहिती समोर येत आहे)

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नोकरी जाणाऱ्यांमध्ये स्मिता झगडे यांचंही नाव होतं. लॉकडाऊनपासून तब्बल तीन महिने त्या घरात होत्या. घरात कमवणाऱ्या त्याच, त्यामुळे त्यांना काहीही करून घरची आर्थिक परिस्थिती टिकवून ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरूवात केली.

सुरुवातीला पुरुष आणि महिला अशा वादाला त्यांनाही सामोरे जावं लागलं, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर सगळे लोक आपोआप शांत बसले. अनेक जण म्हणायचे की हा पुरुषांचा व्यवसाय आहे, महिला किंवा तरुण मुली यामध्ये येऊ शकत नाही त, मात्र असं काही नसतं, महिलासुध्दा यामध्ये ठामपणे काम करु शकतात, हे आता मला सिध्द करायचं आहे, असं स्मिता झगडे म्हणतात.

मला अभिमान आहे की माझी मुलगी टॅक्सी चालवते. समाजामध्ये अशी समजूत जरूर आहे की टॅक्सी फक्त पुरुष चालवतात, महिला चालवत नाहीत, मात्र माझ्या मुलीने तेही करून दाखवलं की मुंबई सारख्या शहरात टॅक्सी व्यवसायामध्ये महिलादेखील पुरषांच्या बरोबरीने काम करू शकतात, असं मत स्मिता यांचे वडील अशोक झगडे यांनी मांडलं आहे.

स्मिता या गेली सात वर्षे ड्रायव्हिंग शिकवणाऱ्या एका कंपनीत कामाला होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे सगळं काम बंद असल्याने त्यांच्या कंपनीने कामगार कपातीचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस स्मिता यांची नोकरी गेली. मागील अडीच वर्षापुर्वी स्मिता यांच्या भावाने एक टॅक्सी खरेदी करून घेतली होती. ती टॅक्सी चालवण्याचा निर्णय स्मिता यांनी घेतला आणि आता स्वत:चा व्यवसाय ते ठामपणे करताना दिसतात.

भविष्यात अजून एक टॅक्सी खरेदी करायचं स्मिता यांचं स्वप्न आहे, तर त्याच टॅक्सीवर एका महिला ड्रायव्हरला ठेवण्याचाही त्यांचा प्रयत्न असणार आहे. टॅक्सी व्यवसायामध्ये महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांची कमाई करू शकतो, त्यामुळे दुसऱ्यांच्या इथे काम करून 15 हजार कमवण्यापेक्षा तितकच काम स्वत:साठी करून त्याच्यापेक्षा अधीक नफा कमवलेलं कधीही फायद्याचं असं स्मिता झगडे इतर महिलांना सांगताना म्हणतात.

गोष्ट पहिल्या गणपतीची आणि केसरीतल्या अग्रलेखाची…

मुंबईत 4 दिवसात 2000 गाड्या जप्त; सगळ्यांना सांगितलं एकच कारण…

पाहा : 127 वर्षांपुर्वी मुंबईतल्या पहिल्या गणेशोस्तवाची सुरूवात कशी झाली?

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments