आपलं शहर

मुंबई पोलिसांचा अजून एक नियम! तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असाल तर तुम्हाला पकडणार आणि…

मुंबई पोलिसांनी सध्या नवीन फतवा काढला आहे. अत्यावश्यक सुविधेमध्ये न येणाऱ्या खाजगी गाड्यांना जप्त करण्यात येणार असल्याचं यात म्हटलं आहे. कोणतंही काम नसताना जर तुम्ही रस्त्यावर विनाकारण फिरत असाल, तर तुमचे वाहन जप्त केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभुमीतून शहर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये “विना परवानगी किंवा विना-आवश्यक वाहन जर रस्त्यावर अढळले, तर त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि वाहने जप्त केली जातील,” असे पोलिसांनी म्हटले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत विनाकारन रस्त्यावर फिरणारे लोक हे फक्त नियमांच्या विरोधातच नव्हे तर आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या विरुध्द जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र काही ट्विटर धारकांनी याला विरोध दर्शवला आहे. काहींनी जोरदार टीकादेखील केली आहे.

या ट्विटला उत्तर देताना अदिन्य श्रीवास्तव नावाचे गृहस्त म्हणतात की पहिला अत्यावश्यक सुविधेमध्ये काय मोडत नाही हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावं, तुम्ही लोक काय बोलता? आता रस्त्यावर अक्षरशः वाहतुकीची कोंडी होत आहे. सर्व अवजड वाहनेदेखील रस्त्यावर उतरली आहेत. सगळेच लोक पोटापाण्यासाठी बाहेर पडतात, त्यामुळे असे नियम लावून काय होणार आहे, असा सवालदेखील त्यांनी विचारला आहे.

अभिसार यांनी या ट्वीटला उत्तर देत म्हटलं आहे की “स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी हे आम्हाला माहित आहे, परंतु आम्ही घरी बसून काहीही करू शकत नाही. या सर्व बकवासांना थांबवा, आम्ही आपल्या भाषणापेक्षा आरोग्याच्या बाबींची काळजी घेत आहोत, कारण आमच्या स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी, हे आम्हाला माहित आहे! पैसे घेऊन, आमच्या गाड्या घेऊन आम्हाला त्रास देणे थांबवा! हे सगळं त्रासदायक आणि लोकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं असल्याचंही अभिसार यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे नेमकं मुंबईतील वाहतून सुविधा नेमकी कशी असणार आहे आणि नेमके अजून कोण-कोणते नियम लागू होणार आहेत, हे पाहाणे आता गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments