आपलं शहर

वकीलाला बजावला 1 रुपये दंड, भरा; नाहीतर 3 महिने कारावास भोगा…

सुप्रीम न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांना सुप्रीम न्यायालयाने तब्बल 1 रुपये इतका दंड बजावला आहे. जर भूषण यांनी या दंडाची भरपाई केली नाही तर त्यांना तीन महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले जाऊ शकते आणि तीन वर्ष सराव करण्यापासून निलंबित केले जाऊ शकते, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने आज अ‍ॅडव्होकेट प्रशांत भूषण यांना 1 रुपये इतकी दंडात्मक शिक्षा सुनावली आहे. न्यायपालिकेवर टीका करणारे ट्विट त्यांनी केल्यामुळे न्यायव्यवस्थेचा अवमान झाला असून त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असल्याचं खंडपीठाने म्हटलं आहे.

25 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना न्यायालयीन समितीवर केलेल्या ट्विटसाठी दोषी मानून त्यांना दोषी ठरवल्यानंतर सुनावणीचे आदेश राखून ठेवले होते, त्यावर आज निर्णय घेण्यात आला.

निकाल जाहीर करताना न्यायमूर्ती मिश्रा म्हणाले, न्यायाधीशांनी पत्रकारांकडे जाण्याची गरज नाही. कोर्टाबाहेर त्यांच्या या केसवर कोणतच म्हणनं मांडलं जाणार नाही. न्यायपालिकेवर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल खंत व्यक्त करण्याच्या अनेक संधी भूषण यांना मिळाल्या असत्या, मात्र भूषण यांनी पत्रकारांकडे जाऊन अवमान प्रकरणातील घटनांना प्रसिद्धी दिल्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे, असं मत न्यायमुर्ती मिश्रा यांनी मांडलं आहे.

हेही वाचाच…

राखी सावंतपासून रिया चक्रवर्तीपर्यंत वकील सतीश मानेशिंदे यांची गाजलेली प्रकरणे…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments