आपलं शहर

मुंबईकरांनो अभिनंदन! तुमचं वर्षभर पाणी कपातीचं टेंशन गेलं…

मुंबईतला पाऊस तेव्हा समाधानकारक समजला जातो, जेव्हा मुंबईला पाणी पुरवठा करणारी सातही धरणे पुर्णपणे भरत नाहीत. आता कुठे हळू हळू ही धरणे भरण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे जिल्हा आणि प्रामुख्याने शहापूरच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा करणारे तानसा धरण आता भरून वाहू लागलं आहे, त्यामुळे 2021 च्या पावसाळ्यापर्यंत मुंबई उपनगरात राहाणाऱ्या मुंबईकरांना पाण्याच्या बाबतीत काळजी करण्याची कोणतीच गरज नाही.

काय आहेत वैशिष्ट्य?
सन 1872 ते 1890 या कालावधीत या धरणाचे बांधकाम करण्यातं आलं. तानसा नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे. तेव्हापासून आजूबाजूच्या परिसरात या धरणच्या पाण्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. आता मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मुख्य धरणांमध्ये याची नोंद झाली आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 208.70 दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

क्षेत्रफळ : 18.81 वर्ग कि.मी.
क्षमता : 208.70 दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : 184.60 दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील गावे : 7
ओलिताखालील क्षेत्र –
वनजमीन : 975 हेक्टर
पडीकजमीन : 581 हेक्टर
शेतजमीन : 325 हेक्टर

या तारखेला भरलं होतं धरण?
20 ऑगस्ट, 2020
25 जुलै, 2019
17 जुलै, 2018
18 जुलै, 2017
2 ऑगस्‍ट, 2016

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. आज सकाळपर्यंत सातही तलावातील जलसाठा हा 12 लाख 62 हजार 119 दशलक्ष लीटर इतका असून तो क्षमतेच्‍या 87.20 टक्‍के एवढा आहे.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments