आपलं शहर

लवकरच राज्यपालांना ठाकरे सरकारचा मोठ्ठा दनका…

2019 च्या विधान सभा निवडणुकीपासून चर्चेत आलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकराकडून मोठा दणका देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार विरुध्द संघाच्या विचारांशी जुळलेले भगतसिंह कोश्यारी असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक कुलगुरूंची निवड ही राज्याच्या राज्यपालांच्या नियुक्तीने होत असते. मात्र राज्यपाल हे संघांच्या विचारसरणीशी जुळलेल्या लोकांचीच कुलगुरूपदी निवड करतात, असा आरोप ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळच्या बैठकीत केला आहे, तर या मताला पशु दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे लवकरच कुलगुरू निवडीचे राज्यपालांकडे असलेले अधिकारी ठाकरे सरकार काढून घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वी संघाच्या विचारसरणीशी मिळते-जुळते असणारे सुभाष चौधरी यांची नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड केल्यानंतर हा वाद समोर आला आहे. सद्य परिस्थितीत कुलगुरू नियुक्तीतचे राज्य सरकारला शून्य अधिकार आहेत. कुलगुरू नियुक्त समितीकडून पाच जणांची नावे पाठवली जातात, त्यातील एकाची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते, अशी माहिती नितीन राऊत यांनी याच बैठकीत दिली, सोबतच कायदा विभागाकडून या संदर्भातला अभिप्राय मागीतला आहे आणि लवकरच या हालचालींना वेग येईल, अशी माहिती समोर येत आहे.

ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात अनेकदा मतभेद झाल्याचेही आपल्याला पाहायला मिळाले आहे. त्यात विद्यापीठांच्या परीक्षा, राज्यपाल नियुक्त आमदार असे अनेक वाद समोर आले आहेत. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या या वादावर काय तोडगा निघणार हे पाहाणे आता गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments