एकदम जुनं

पाहा राम मंदिराच्या वादाची सुरूवात आणि संपुर्ण घटनाक्रम; अखेर 489 वर्षांचा वाद थांबला!

भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात दाखल केले. यांच्यावर आरोप होता अयोध्येतल्या बाबरी मस्जिद पाडण्याच्या षडयंत्र प्रकरणात सहभागी असल्याचा. 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्याचा कट यांनी रचला होता, असं सरकार दरबारी नमूद केलं गेली आणि यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुप्रीम कोर्टाने 13 नेत्यांवर बाबरी मस्जिदीचा भाग पाडल्याच्या प्रकरणावर फौजदारी खटला चालविण्याचे आदेश दिले. परंतु बाबरीचा वाद दशकांचा नसून शेकडो वर्षांचा आहे, हे विसरूनही आपल्याला चालणार नाही. “बाबरी मस्जिद की राम मंदिर” या प्रश्नाची कहाणी नेमकी कुठून सुरू होते, तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

वादाचा घटनाक्रम आणि पेटणारी अयोध्या…

 • सण 1528 : हिंदूंचं देवस्थान माणल्या जाणाऱ्या जमिनीवर बाबरने अयोध्येत एक मस्जिद उभारली.
 • 1853 : मंदिर फोडून मस्जिद बांधल्याच्या विषयावरून पहिली हिंदू-मुस्लिम अशी दंगल संपुर्ण देशभर पेटली.
 • 1859 : ब्रिटीश सरकारने विवादित जमीन विभागून अंतर्गत आणि बाह्य परिसर तयार केला.
 • 1885 : राम मंदिराच्या पुन: उभारणीसाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आणि त्यावेळी महंत रघुबर दास यांनी राम मंदिर बांधण्यासाठी कायदेशीर परवानगी घेण्यास सुरूवात केली.
 • 1949 : 23 डिसेंबर रोजी सुमारे 50 हिंदू नागरिकांनी मस्जिदच्या मध्यवर्ती ठिकाणी भगवान श्री रामाच्या मुर्तीची स्थापना केली.
 • 1950 : यावर्षी 16 जानेवारी रोजी वादग्रस्त जागेवरुन भगवान श्री रामांची मुर्ती हटवण्यासाठी न्यायालयात अपिल करण्यात आली.
 • 1950: 5 डिसेंबर रोजी मस्जिदला ‘ढांचा’ असे नाव देण्यात आले आणि तिथून भगवान श्री रामांची मूर्ती ठेवण्यास परवाणगी देण्यात यावी, यासाठी खटला सुरू केला.
 • 1959 : 1 डिसेंबर रोजी निर्मोही आखाड्याने या वादात उडी घेतली आणि ही जमिन रामाची असल्याचा दावा केला.
 • 1961 : 18 डिसेंबर रोजी सुन्नी सुन्नी वक्फ बोर्डाने हा जागेवर बाबरी मस्जिदीचा अधिकार असल्याचा दावा केला.
 • 1984 : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मंदिरातील कुलूप उघडण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
 • 1986 : 1 फेब्रुवारी रोजी फैजवाद जिल्हा कोर्टाने विवादित ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली.
 • 1989 : या वर्षाच्या जून महिन्यात भारतीय जनता पक्षाने मंदिर आंदोलनात विश्व हिंदू परिषदेला पाठिंबा दर्शविला.
 • 1989 : 1 जुलै रोजी या प्रकरणात पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला.
 • 1989: 9 नोव्हेंबर रोजी बाबरीजवळ राम मंदिराची पायाभरणी करण्यात आली.
 • 1990 : 25 सप्टेंबर रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. मात्र या रथयात्रेनंतर देशात जातीय दंगल्या भडकू लागल्या.
 • 1990 : दंगली भडकवल्याच्या आरोपाखाली लालकृष्ण अडवाणी यांना नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली. त्यामुळे भाजपने केंद्रात असलेल्या व्ही.पी. सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
 • 1991 : अक्टोबर महिन्यात बिहारमध्ये असलेल्या भाजपशासित कल्याणसिंग सरकारने विवादात अडकलेल्या राम मंदिराच्या जमिनीला ताब्यात घेतले.
 • याचा परिणाम देशात मोठा झाला; तो म्हणजे 6 डिसेंबर 16 डिसेंबर 1992 या दरम्यान बाबरी मस्जिदीचा ढाचा हिंदू कार सेवकांकडून पाडण्यात आला. या संपुर्ण घटनेची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यावर घेतली होती.
 • 1992 : सुरू झालेल्या वादावर आणि झालेल्या तोडफोडीवर तोडगा काढण्यासाठी 16 डिसेंबर रोजी एस.एस. लिब्रहान कमिशनची स्थापना झाली.
 • 2002 : त्यावेळेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी हा वाद मिटविण्यासाठी अयोध्या विभाग सुरू केला.
 • 2002 : एप्रिलमध्ये विवादित जागेच्या मालकीसाठी हायकोर्टात सुनावणी सुरू झाली.
 • 2003 : मार्च ते ऑगस्ट महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, वादग्रस्त ठिकाणी खोदकाम केले गेले आणि मस्जिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याचा पुरावा सापडला.
 • 2003 : सात हिंदू नेत्यांना सप्टेंबरमध्ये सुनावणीसाठी बोलावण्याचा निर्णय.
 • 2005: इस्लामिक दहशतवाद्यांनी जुलैमध्ये वादग्रस्त भागावर हल्ला केला आणि या घटनेत पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
 • 2009 : लिबर्हान कमिशनने जुलैमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अहवाल सादर केला.
 • 2010 : 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त खटल्याची दखल घेऊन केलेली याचिका फेटाळून लावली.
 • 2010 : 30 सप्टेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला.
 • 2017: 21 मार्च सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात लवादाची ऑफर दिली आहे.
 • 2019 : 9 नोव्हेंबर 2019 रोजी, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपिठाने संबंधित वादग्रस्त जमीन सरकारच्या कराच्या नोंदीनुसार आहे, त्यात हिंदू मंदिर बांधण्याची परवाणगी देण्यात येत आहे, ही जमीन एका ट्रस्टकडे देण्यात येईल आणि ट्रस्टच्य माध्यमातून हे मंदिर उभारलं जाईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. तसेच मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद उभाण्यासाठी पर्यायी 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे आदेश उत्तर सरकारला देण्यात आले.

या संपुर्ण लढाईन आतापर्यंत शेकडो जणांचे प्राण गेलेत, तर हजारो जण जखमी झालेत. आतापर्यंत अनेकांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्या तर अनेकांनी गोळ्यादेखील झेलल्या. या सगळ्यातून आज राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे, हा क्षण अनेकांसाठी दिवाळीपेक्षाही कमी नाही.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मीडियाला भेट द्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments