आपलं शहर

8 तास मॅनहोलजवळ उभ्या असलेल्या कांतामुर्तींच त्यादिवशी घर वाहून गेलं होतं…

काही दिवसांपुर्वी म्हणजेच 4 ऑगस्ट 2020 रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यादरम्यान रस्त्यावर पाणी साचलेले अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील आणि शेअरदेखील केले असतील. अशातच अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, तो म्हणजे एका मॅनहोलजवळ उभे राहिलेल्या महिलेचा. त्या महिलेचं नाव आहे कांतामुर्ती कल्याण.

4 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजल्यापासून मोठ्या पावसाला संपुर्ण मुंबईत सुरूवात झाली. अनेक बीएमसी कर्मचाऱ्यांनाही कुठेही हालता येत नव्हतं. त्यामुळे अनेक भागात उपाययोजना राबल्या न गेल्यामुळे पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं. मुंबईतल्या माटुंग्यामध्येही असच पाणी साचलं होतं. माटुंगा येथे असलेल्या तुळशी पाईपच्या फुटपाथवरच या कांतामुर्ती कल्याण राहातात. त्यादिवशीच्या पावसामुळे या परिसरातही पाणी साचलं होतं.

तुळशी पाईपलाईच्या रस्त्यालगतच्या फुटपाथवर राहाणाऱ्या कांतामुर्तींचं सगळं घऱदारही या पाण्यातून वाहून गेलं. ज्या पाण्यात आपलं सगळं वाहून गेलं. त्यात इतरांचही साहित्य वाहून जाऊ नये, म्हणून जवळचं मॅनहोल कांतामुर्तींनी उघडं केलं. आपण उघडं केलेल्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये किंवा कोणती गाडी अडकू नये, म्हणून कांतामुर्ती स्वत: त्या मॅनहोलजवळ उभ्या राहिल्या आणि त्यांनी केलेली समाजसेवा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments