खूप काही

मुंबईची निर्मिती आणि इथे अनेक संस्था उभे करणारा एकमेव व्यक्ती…

सध्या मुंबईकडे सर्वगुण संपन्न म्हणून पाहिले जाते. मात्र ही मुंबई नेमकी कोणी निर्माण केली, त्यामागचा उद्देश काय होता, हे काही जणांना माहित नाही. मुंबईतली खूप काही जुणी आणि महत्वाची ठिकाणी ज्यामध्ये एल्फिन्स्टन रोड, जे जे स्कुल ऑफ आर्ट, लोकलची स्थापना, मुंबई महानगर पालिका किंवा इतर राजकिय पक्षांची सुरूवात; अशा सगळ्यांची सुरूवात जगन्नाथ उर्फ नाना शइंकरशेट यांनी केली आहे.

मुंबईच्या सुरूवातीच्या काळातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून नानांची ओळख होती, त्यामुळे सर्रास परदेशी व्यापारी नानांच्या वडिलांकडे पैसे राखून ठेवण्यासाठी देत असत. लहान वयातच नानांच्या वडीलांचा मृत्य झाल्याने त्यांचा सगळा कारभार नानांकडे आला. मात्र वडिलांप्रमाणे फक्त कमवते न राहाता दाता म्हणून नानांनी काम केलं.

मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्था, उद्याने, दवाखाने, बँका, उद्योग, स्मशान भूमींच्या निर्मितीमध्ये नानांनी सढळ हाताने मदत केली होती. मुंबईतल्या 25 हून अधीक संस्थामध्ये त्यांना पद देण्यात आलं होतं. शिक्षण प्रसार समिती, मुंबई विद्यापीठ, जिओग्राफीकल सोसायटी, हॉल्टीकल्चर सोसायटी, ग्रेट इस्टर्न रेल्वे, म्युनिसिपल कायदा आणि बिल समिती, नाट्यगृहे अशा अनेक संस्थामध्ये त्यांचा सहभाग होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments