एकदम जुनं

मोदक निर्मितीचा हा आहे खरा इतिहास, जेव्हा आई पार्वती…

अस म्हंटल जातं, माणसाचे मन जिंकायचे असेल तर त्याचा रस्ता पोटापासून सुरू होतो. म्हणजेच, हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने. देव बाप्पाचंही असंच काहीसं आहे, गणेशोत्सवाच्या काळात, गणपती बाप्पाला पहिला नैवद्य हा मोदकांचा दाखविला जातो.

गणपती बाप्पालाच नव्हे तर, चिल्ल्या पिल्यानंपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोदक आवडतो. गणपती बाप्पाचे अस्तित्व व गणेशोत्सव साजरा करण्यामागचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहित असेल; पण गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या मोदकाचा इतिहास आपल्याला माहीत आहे का, सर्वांनाच प्रिय असणारा “मोदक” नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे आज आपण वंटास मुंबईच्या या गणेशोत्सव स्पेशल मधून जाणून घेणार आहोत.

मोदकाचा जन्म कधी आणि कसा झाला?
‘मोदक’ या शब्दाचा अर्थ मोद असा आहे, म्हणजे जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो, त्याला ‘मोदक’ असे म्हटले जाते. भक्त आपल्या गणपती बाप्पाला मोदक खाऊ घालतात, ज्याने आपला विग्नहर्ता आनंदी होईल. तसेच बाप्पाला मोदक विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात. मुळात, मोदक या पदार्थाचा जन्म हा दोन वेगवेगळ्या संदर्भ विभागात झाला आहे. एक म्हणजे, पुराण काळातला आणि दुसरा अलिकडच्या काळातला. दोन पुराण कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे.

पुरातन काळातील मोदकाची कथा असं सांगते की, एकदा देवदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक, देवी पार्वतीसाठी घेऊन आले. तेथून मोदकाचा जन्म झाला असावा. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले. दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला. त्यावर, आपण लहानपणी बाल गणेशा चित्रपटात पाहिले असेल, त्यात देवी पार्वती गणेशा आणि कार्तिकेय यांच्यामध्ये एक स्पर्धा आयोजित करत धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल असे सांगितले. यावर, कार्तिकेय तीर्थक्षेत्र परिक्रमेस निघून गेला तर गणेशानं मातापित्यांना प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकले. आणि तो मोदक गणेशाला प्राप्त झाला. तेव्हापासून गणपती बाप्पाचा मोदक हा पदार्थ प्रिय झाला.

दुसरी कथेतील बाजू अस सांगते की, अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिनं आदरभावानं भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्रीगणेश यांना भोजनास आमंत्रित केलं. नानाप्रकारची चविष्ट पक्वान्नं त्यांच्या भोजनासाठी बनविली व त्यांना प्रेमाने खाऊ घातली. परंतु, सर्व भोजन फत्ते झाले तरीही काही आपल्या गणपती बाप्पाची भूक काही भागेना. यावर, अडचणीत सापडलेल्या अनसूयेनं गोड पक्वान्नानं गणपती बाप्पांचं पोट निश्चितच भरेल असा विचार करत नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ तयार केला. आणि खरंच, तो पदार्थ खाऊन बाप्पाचे पोट भरले. देवी पार्वतीनं कुतुहलानं अनसुयेला त्या पदार्थाची कृती आणि नाव‌ विचारले. तोच हा मोदक. आणि तेव्हापासून 21 मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवला जातो, असं ही कथा सांगत अशाप्रकारे पुराणकाळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो.

कशी वाटली ही माहिती हे आम्हाला जरूर कळवा, मोदकाचा जसा इतिहास आपण जाणून घेतलात तसा गणपती बाप्पाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या वंटास मुंबईच्या इतरही पोस्टला भेट द्या. बाकी, अशाच वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मीडियाला फॉलो करा.
तोपर्यंत…
|| गणपती बाप्पा मोरया ||

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments