एकदम जुनं

प्राचीन मुंबईतल्या त्या आठ नद्या, त्यातल्या काहींचा आज नामोनिशाणही नाही…

आज मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात अनेकठिकाणी पाणी साचतं. काहींच म्हणणं आहे की काही वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी नद्या होत्या. मात्र आता त्यांचा नामोनिशाणही नाही. मुंबईत फक्त आता नाले दिसतात, त्यात नद्यांच वास्तव कुठेच दिसत नाही, नेमक्या त्या नद्या कोणत्या होत्या, हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

मुंबईत डोंगराळ भागातून वाहणाऱ्या आणि समुद्राला मिळणाऱ्या तशा खूप नद्या होत्या, मात्र मुंबईत पडलेल्या भरवामुळे आणि विकसंशिलतेमुळे बहुतेक नद्या लुप्त झाल्या आहेत तर शिल्लक असलेल्या व आकुंचन पावलेल्या नद्या अनेक इमारतींच पाणी वाहून नेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मिठी नदीची अवस्था तर प्रचंड प्रदुषित असून सांडपाण्याच्या नाल्यांसारखी झाली आहे.

त्या नद्या कोणत्या…
1) दहिसर नदी
2) पोयसर – पोईसर नदी
3) चंद्रपुर नदी
4) ओशिवरा नदी
5 वाकोला नदी
6) गाढी नदी
7) महाबली -माहुल नदी
8) महिकावती मिठी नदी

दहिसर नदी
दहिसर नदी ही बोरिवली पूर्वेकडे १० फूट कानरी बुद्धलँड व मुंबईतील बोरीवली नॅशनल पार्कमधील तुळशी तलावातून उगम पावते.
या नदीवर सातवाहन नाग सम्राटांनी धरण निर्मान केले आहे. असं म्हणतात. 12 किलोमीटर लांबीची ही नदी 10 गावांना काठाने घेत पचिपाश्चमेला महासागराला जाऊन मिळते. 1867 साली ब्रिटीषांनी या नदीच्या नावाचे दहिसर हे रेल्वे स्थानक सुरू केले.

पोयसर नदी
कांदिवलीचा जो डोंगर आहे, तिथून पोयसर नदी उगम पावते. आता तिथे महिंद्रा कंपनी, ठाकूर संकुल व कांदिवली हे गाव आहे. ही नदी मोहितेवाडीहून (कांदिवली वेस्ट) अरबी समुद्रात जाऊन मिळते.

1985 साली या नदीला महापूर आला होता आणि त्यात मोहीतेवाडी उध्वस्त झाली होती, अशी माहिती आहे. पोर्तुगीजांनी तिथल्या एका टेकडीला माउंट मौना पोड़ैचर जे आताच पोयसर, अस विदेशी नाव दिले.

चंदनसर नदी
बोरिवली पश्चिम मंडलेश्वर येथे जे लेणं आहे ते चंदनागराजाने निर्माण केलेले प्राचीन चंदनसर हे बुद्ध लेणं आहे. इथल्या टेकड्या मधून ही नदी वाहत होती. 1565 साली पोर्तूगीजांनी लेनी व टेकड्या उध्वस्त केल्या. परिणामी मुंबईच्या नकाशा मधून ही नदी अदृश्य झाली.

ओशिवरा नदी
गोरेगाव व आरती कॉलिनीच्या टेकड्या मधून या नदीचा उगम होतो. या ८ किमी. नदीचे मूळ पात्र 200 फूट रूंद होते. या नदीचं नाव आता एका मेट्रोच्या स्टेशनला ठेवण्यात आलं आहे.

वाकोला नदी
मारवे, जीबी नगर, शहरगाव सांताक्रूझ येथे या नदीचे नामकरण होते. जे नागवंशी योध्याचे वाश्कळ (वाश्कळ ही कोब्रा नागाची जात). ब्रिटिश काळात वाकोला हे गाव प्रसिद्ध झाले. सांताक्रूझ पूर्वेला नदी डावीकडे BKC नंतर विठीमहा नदीला विलीन होते.

गाढी नदी
सायन कॉझवेच्या बाजूने गाढी नदी मुंबईला दोन भागात दुभागते. पूर्वेला थेट पनवेलपर्यंत ही नदी गेल्याची माहिती आहे. या नदीतून नागरिक जलवाहतूक प्रवास करत होते, नंतर तो बंद झाला. परंतु आजही पनवेलमध्ये गाढी नदी आहे. नदी काठी (आजच्या धारावीत) ब्रिटिशांनी एक किल्ला बांधला, जो आजचा काळा किल्ला होय. मग नागरिक विस्तारल्याने ब्रिटिशांनी ही नदी बुझवली.

महावली (माहुल) नदी
चेंबूर, माहूल असा असा प्रवास करून ही नदी येत असल्याने हिला महानदी म्हणतात. चौथ्या शतकात बुद्ध संस्कृतीमुळे चेंबूर आणि माहुल यांच्या दरम्यान महाबली बुद्धविहार होते. यावरून नदीला महाबली नदी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. कोळी व आग्री समाजातील नागरिकांनी नंतर या नदीचे नाव माहूल केलं.

महिकावती नदी
महिकावतीची बखर म्हणून काही लोकांत प्रसिद्ध आहे. इ.स.पूर्व २४९ ला नागनगरी मुंबईचे नांगशाषक नंदनाग व उपनंदक नागराज यांनी मीठाच्या व्यवसायाला प्रारंभ केला. कारण मिठाला तेव्हा खूप भाव यायचा. नंतर तेच मीठ महिकावती नदीच्या मार्गे ग्रीस, इराण व इजिप्तला निर्यात होऊ लागले.

1750 मध्ये मीठ वाहतुकीमुळे कोळी व आग्री लोकांनी मिठी असं नदीचं रोचक नाव प्रचिलीत केले. नदीकाठी पूर्वी भात शेती होती. धारावीला एक धम्का होता व चुनाभट्टी एक बंदर होते.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा. अजून अशा काही ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी सोबतच वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाला नक्की भेट द्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments