एकदम जुनं

मुंबईतल्या 7 बेटांबद्दल कर्नल जर्व्हसचा नकाशा काय सांगतो?

मुंबईत सध्या कोटीच्या घरात लोकं राहातात, हे इथल्या कुठल्यातरी लोकल स्टेशनवर उभे राहून पाहिल्यावर सहज समजून येते, 1971 साली हीच संख्या 5.61 दशलक्ष होती, 1881 साली तीच संख्या 8.20 दशलक्ष झाली आणि आज जवळपास एकट्या मुंबईची लोकसंख्या 3 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मुंबई शहर हे एका बेटापासून न जिकडे वाट दिसेल तिकडे पसरत गेलं. या लोकसंख्येमुळे जागा मिळेल तिथे घरं उभारली गेली आणि इथल्या बेटांचं अस्तित्व हळू हळू नाहीसं झालं.

मुंबईत खूप वर्षांआधी एकच बेट होतं, ते म्हणजे सालशेत. त्या बेटाचे नंतर विभाजन होऊन अनेक छोटीमोठी बेटे निर्माण झाली. इंग्लंडवरून आलेल्या कर्नल जर्व्हस याने 1825 साली एक नकाशा तयार केला होता, त्या नकाशामध्ये या बेटांचा वेगळा संदर्भ देण्यात आला आहे. काही वर्षांपुर्वी मुंबईत वांद्रे, वेसाव, मारवे, धारावी आणि राय मुर्डे ही बेटे होती.

या संपुर्ण बेटांवर कोळी समाजाचं मोठ्याप्रमाणात राहाणिमान असल्याने संपुर्ण बेटावर इतर समाजाचे लोक असूनही कोळी समाजाच्या लोकांचं वर्चस्व चालायचं. दक्षिण बेटांवर कोला-भार समाजातील कोळी लोक राहात असत, म्हणून त्या भागाला कुलाबा असे नाव देण्यात आलं. त्यानंतर आपल्या सोईनुसार अनेक कोळी लोकांनी आपली राहाण्याची जागा बदलली आणि सायन कोळीवाडा, माहीम कोळीवाडा, मोरी कोळीवाडा (वरळी) आणि सालशेतमध्ये कोले-कल्याण असे कोळी समाजातील प्रजाती निर्माण झाल्या आणि त्या त्या समाजानुसार तेथील ठिकाणाला नाव देण्यात आलं.

एका हाफकिनमुळे कायमची बंद होणारी मुंबई वाचली…

तुम्ही कुलाबा रोडकडे कधी गेलात, तर ‘या’ गोष्टी नक्की पाहा…

धोनीचे ‘हे’ विक्रम पाहिले, तर त्याला तुम्ही क्रिकेटचा बापमाणूस म्हणाल…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments