एकदम जुनं

गणेशोत्सवाचे जनक कोण; टिळक की भाऊ रंगारी?

यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतदेखील साध्या पद्धतीत गणेशोत्सव साजरा होत आहे, काही सार्वजनिक मंडळांनी तर यंदाचा गणेशोत्सव हा साजरा न करण्याचादेखील निर्णय घेतला आहे. यावर्षी जरी सार्वजनिक गणेशोत्सव काही प्रमाणात साजरा होत असला तरी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली, हा प्रश्न दरवर्षी उपस्थित होतो. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात पुण्यात झाली ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे, पण ही सुरुवात कोणी केली हा वादाचा विषय आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती, असा पुण्यातील भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे.

“लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली, तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षं आधी म्हणजेच 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती,” असं रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात.

भाऊ रंगारी कोण होते?
“भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायानं वैद्य होते. त्यांच्या दुमजली घरात धर्मार्थ दवाखाना होता. त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावे सेवा करत असत. तसंच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता. “भाऊसाहेबांचा पंरपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून त्यांना रंगारी हे उपनाव पडलं होतं.”

“गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र येत असेल, तर ती आनंदाची बाब आहे, असं टिळकांनी म्हटलं होतं. रंगारी यांनी आपल्याआधी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली, ही बाब टिळकांना मान्य होती हे यावरून स्पष्ट होतं.

1894 साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विंचूरकर वाड्यात गणपतीची स्थापना केली. 1894 साली पुण्यात शंभरावर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. “केसरीत गणेशोत्सवाबद्दल लिहिल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतं.

मग टिळकांच योगदान काय?
भाऊ रंगारींनी पहिल्यांदा गणपती उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं असलं, तरी त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम टिळकांनी केलं, असं जाणकारांचे मत आहे. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असं इतिहासकारांच मत आहे.

“टिळक तुरुंगात गेल्यावर गणेशोत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुर होते, पण त्यावेळी जी गाणी किंवा पदं म्हटली जात होती, त्यातला भडकपणा कमी झाला होता. गणेशोत्सवाचा टिळकांना फायदा होऊ नये, म्हणून गणपतीशिवाय इतरांचा जयजयकार करण्यास, त्यांचे किंवा त्यांच्या नातेवाइकांचे फोटो लावण्यास, प्रमुख जागी उभं राहून त्यांना माळा वगैरे घालण्यास, भजनी मंडळीस वा मेळ्यास उद्देशून भाषणं करण्यास मनाई करण्यात आली.

टिळकांना भाषणाची बंदी घालण्यात आल्यानंतर ते एक शब्द न बोलता कार्यक्रमास उपस्थित राहत असत. त्या परिस्थितीत ते देखील पुरेसं होतं, असं मोरे यांनी लिहिलं आहे. पुढे त्यात लिहिलं आहे की गणपती मिरवणुकी दरम्यान काही उत्साही युवक ‘टिळक महाराज की जय’ म्हणत असत. त्यांच्यावर कारवाई देखील होत असे.

टिळक आणि भाऊ रंगारी
टिळकांचे आणि भाऊ रंगारी यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते. पहिल्यांदा जेव्हा रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची 1893 साली सुरुवात केली, तेव्हा त्यांचा टिळकांनी ‘केसरी’मधून गौरव केला होता. टिळक हे रंगारी यांच्या गणपती ट्रस्टचे ट्रस्टी देखील होते.

सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना भाऊसाहेब रंगारी यांनी केली की लोकमान्य टिळकांनी केली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

बाप्पा; स्वतःच घेणार भक्तांची काळजी, मुंबईत सॅनिटायझर बाप्पाची चर्चा…

बाप्पाच्या विसर्जनासाठी फक्त एक कॉल; फिरता तलाव येणार सोसायटीच्या दारात…

मुंबईतले ‘हे’ तेरा पुल धोकादायक! गणेशोस्तवाच्या काळात या पुलांचा प्रवास टाळावा…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments