एकदम जुनं

‘या’ व्यक्तीने बनवला मुंबईतला पहिला वडापाव…

एका पावाच्या दोन तुकड्यात घालून दिलेला बटाटा वडा, हा बर्‍याच मुंबईकरांसाठी सर्वात आवडता नाश्ता आहे, मात्र या वडापावाची संकल्पना नेमकी कोणी आणली, हे सहजासहजी कोणाला माहित नाही, हेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सन 1960 नंतरचं दादर. सगळीकडे झुनका भाकरची चर्चा. नाश्ता, दुपारचं जेवन, रात्रीचं जेवन हे सगळं चालायचं झुनका भाकरवर. या सगळ्यात भर पडली वडापावची. गोव्यातल्या वसाहतीत चवदार वडापाव बणवणारे अशोक वैद्य रेल्वेने दादरला उतरले आणि त्याच ठिकाणी एक गाडा सुरू केला.

अशोक वैद्य यांचे 18 वर्षांपूर्वी निधन झाले. आज त्यांचा मुलगा नरेंद्र वैद्य अत्यंत स्पर्धात्मक बाजारात वडिलांचा वारसा जिवंत ठेवण्यात व्यस्त आहे. आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की फास्टफूडचा व्यवसाय करणे खूप सोपे आहे, पण तसं नाही. ज्यांनी या मुंबईत वाडापावची सुरूवात केली, त्यांच्यासोबत स्पर्धा करणारे आज बाजारात खूप आहेत, त्यामुळे नरेंद्र वैद्य यांनादेखील स्पर्धा करावी लागते, मात्र त्यांच्याकडे असलेली चव, स्वच्छता आणि ग्राहकांची विश्वासाहर्ता अशा मुद्दांना सोबत घेऊन ते अजूनसुध्दा वडापाव घेऊन मुंबईकरांची सेवा करत आहेत.

दररोज, नरेंद्र आणि त्यांची आई मंगल वैद्य पहाटे 4 वाजता वडा बनवण्यास सुरवात करतात. गेल्या 50 वर्षात रेसिपीमध्ये बदल झालेला नाही, आपल्या पतीने बनवलेल्या पहिल्या वडापावाची जी चव होती, तीच चव राखून ठेवणे, म्हणजे आपल्या वडिलांचा वारसा चालवणे होय, आणि आम्ही तशा पद्धतीनेच आजही काम करत आहोत, अशी माहिती मंगल वैद्य देत असतात.

“माझे वडील आम्हाला सांगायचे,‘ तुमच्या वडिलांनी याची सुरुवात केली आहे. एक लक्षात ठेवा की तुम्हाला हे कायमस्वरूपी चालवायचं आहे. 1960 च्या दशकापासून आम्ही वडिलांना मदत करण्यासाठी सुरूवात केली. पहिल्यापासून वडिलांनी मुंबईकरांची राखून ठेवलेली ओळख, त्यांचा विश्सास राखून ठेवणे, हेच आता आमचं ध्येय आहे, असे मत नरेंद्र वैद्य सांगतात.

हेही वाचाच…

world Vadapav Day : मुंबईचा वडापाव हा खुद्द मुंबईचा नाही, तो बाहेरून आला आहे…

बाप्पाला याच पदार्थांचा प्रसाद का आवडतात…

मुंबईत या ठिकाणी मिळू शकतं धाब्यावरचं जेवन…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments