एकदम जुनं

मुंबईच्या दाऊदला पाकिस्तान का बाळगतय? पाहा; दाऊदचा मुंबई पॅटर्न…

प्रत्येक महिन्यात एकदातरी काही न करता चर्चेत येणारा व्यक्ती म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर. आज तो पुन्हा चर्चेत आलाय, कारण पाकिस्तानावर जगाने घातलेला दबाव. आर्थिक मंदीच्या सावटात असलेल्या पाकिस्तानाने आता देशात राहाणाऱ्या 50 हून अधीक वाँटेड लोकांची कुंडली जाहीर केली आहे. ज्यात दाऊदचंही नाव आहे.

दाऊदचे पाकिस्तानातले दोन पत्ते…
पहिला पत्ताः
6 ए, खयाबन-ए-तंजीम, फेज 5, डिफेन्स हाऊसिंग एरिया, कराची

दुसरा पत्ताः
डी 13, ब्लॉक 4, सेक्टर 5, कराची विकास प्राधिकरण, क्लिफ्टन, कराची

डॉनचे कुटुंब
दाऊद कराचीत त्याची पत्नी मजबी शेख, एकुलता एक मुलगा मोईन नवाज आणि तीन मुली महरुख, मेहेरिन आणि माजिया यांच्यासह राहतो. (त्याच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे)

सन 1993 मध्ये मुंबई झालेल्या दहशतवादी हल्लात दाऊदचा मोठा हात असल्याचं उघड झालं. थेट मुंबईशी कनेक्शन असलेल्या दाऊदने मुंबई पोलिसांवर असलेल्या रागाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता, असंही म्हटलं जातय. ज्यावेळेस मुंबईत बाँबस्फोट झाला, त्यावेळेस दाऊद दुबईत होता, मात्र त्यानंतर लगेच त्याचं सुरक्षित ठिकाण म्हणजेच पाकिस्तानात तो निघून गेला.(सध्या मुंबईत त्याच्या नावावरून चालणारे सर्व कारभार तो तिथूनच सांभाळत असतो, असंही म्हटलं जातय.)

पाकिस्तानच्या कराचीन जगभरात असलेलं नेटवर्क दाऊद चालवतो. तिथल्या सरकारमध्येही दाऊदच्या शब्दाची चांगली किंमत असल्याचंही म्हटलं जातय. दाऊद जेव्हा पहिली वेळ कराचीत गेला, तेव्हा तिथला कोस्टल भाग संपुर्ण रिकामी होता, मुंबईच्या कोस्टल भागांमध्ये स्वत:चा धंदा पसरवणाऱ्या दाऊदने तिथेही मुंबई पॅटर्नचा वापर करत आपला दबाव निर्माण करण्यास सुरूवात केली.

कराचीत जातात दाऊदने रिअल ईस्टेटमध्ये इनव्हेस्टमेंट करण्यास सुरूवात केली. आपल्या व्यसायात आड येणाऱ्या अनेकांना गँगवॉरचा हिसका दाखवण्यासही दाऊद मागे राहिला नाही. अनेक पार्ट्यांचं अयोजन करायचं आणि त्या पार्ट्यांना बड्या आणि राजकीय लोकांना बोलावून त्यांच्याकडून आपल्या पुढच्या प्रोजेक्टची कामं करून घेण्यास दाऊदने सुरूवात केली.

अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसोबतच अनेकांच्या कमजोरीवर पाय ठेवत दाऊदने पाकिस्तानात एक नवी ओळख निर्माण केली. ही अशी ओळख होती की तिथे त्याच्याकडे बोट करणारंदेखील आता कोणी नव्हतं. स्वत: कडे असलेल्या काळा पैशाला पांढरा करण्याच्या कामालाही तो लागला. युएई, आखातीसारख्या देशांमध्ये असलेल्या कंपन्यासोबत दाऊदने करार करण्यास सुरूवात केली.

फक्त युएई, आखाती नाही, तर ऑस्ट्रेलिया, सुदान, मलेशिया, बँककॉक या देशांमध्येही दाऊदने भलीमोठी इन्वेस्टमेंट करून ठेवली आहे. याच्यातून मिळणारा भरमसाठ पैसा तो शेअर मार्केटमध्ये लावतो. मात्र हे सगळं करताना त्याचं सुरक्षित ठिकाण कराची कधीच सोडत नाही.

पाकिस्तानच्या सरकारी तिजोरीतही दाऊदकडून भरमसाठ पैसा जात असल्याने सराकरही चुप आहे. मात्र जेव्हा जगाच्या पातळीवर पाकिस्तानाचा विचार सुरू झाला तेव्हा कोणताही पर्याय न उरलेल्या पाकिस्तानी सरकारला त्यांच्या छत्रछायेखाली असलेल्या मोस्ट वाँटेड लोकांना पत्ता जाहीर करावाच लागला.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशा वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाशीही कनेक्ट राहा.

काही दिवसांपुर्वी दाऊदला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments