आपलं शहर

वरळीच्या 57 इंच व्यासाची जलवाहिनी एका रात्रीत झाली दुरुस्त…

मुंबईत बीएमसीने एखाद्या कामाला सुरूवात केली आणि ते रखडलं, असं सहसा होत नाही, याचं एकमेव कारण की इथले कर्मचारी. अशीच एक कामगिरी बीएमसी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. त्यामुळे महानगरपालिकेच्या जल खात्याचे अभियंता व कर्मचाऱ्यांचं चांगलच कौतूक केलं जात आहे.

वरळी नाक्याजवळील डॉ. ई. मोझेस मार्गावर असलेल्या वरळी टेकडी जलाशयातून पाणी पुरवठा करणाऱ्या 57 इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला अचानक गळती लागली. हे समजताच इथल्या महानगर पालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवस आणि अचानक सुरू झालेली पाणी गळती, त्यामुळे मुंबईकरांच्या सणामध्ये कोणतीच अडचण येऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं काम म्हणजे महानगरपालिकेचा अभिमान वाढणारी गोष्ट आहे, हे नक्की.

संबंधीत जलवाहिनीमधून वरळी तसेच आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वरळी विभागातील डॉ. ई .मोझेस मार्ग, बीडीडी चाळ, नारायण पुजारी मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, वरळी दूध डेअरी मार्ग या परिसरांमध्ये प्रामुख्याने याच जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. मात्र या कोणत्याच परिसरातला पाणीपुरवठा खंडीत न जल अभियंता विभागाच्या दुरुस्ती विभागाने केलेलं काम अभिमानास्पद म्हणावं लागेल.

जल विभागाचे प्रमुख अभियंता अजय राठोर, उप जल अभियंता कमलापुरकर, सहाय्यक अभियंता जीवन पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी या कामाला पूर्णविराम दिला.

हेही वाचाच…

world Vadapav Day : मुंबईचा वडापाव हा खुद्द मुंबईचा नाही, तो बाहेरून आला आहे…

गोष्ट पहिल्या गणपतीची आणि केसरीतल्या अग्रलेखाची…

तुम्हाला माहित आहे का? बाप्पाला ‘या’ पदार्थांचा प्रसाद का दाखवतात…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments