भुक्कड

तुम्हाला माहित आहे का? बाप्पाला ‘या’ पदार्थांचा प्रसाद का दाखवतात…

आतुरतेने वाट पाहणारा सण अखेर आलाच. लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत आपल्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा करणारे भक्त कोरोना संकटाच्या काळात देखील तितकेच आतुर दिसत आहेत. बाप्पाच्या चरणी, गणपती बाप्पा मोरया, कोरोनाला हरवूया! अशा प्रार्थना करत आहेत. बाप्पा घरी आले म्हणजे एक भक्तिमय वातावरण निर्माण होतं आणि घरी भक्तांना पारंपरिक चमचमीत पदार्थांची रेलचेल घरोघरी चाखायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, गोडीधोडीच्या पदार्थांनी गणेशोत्सव सण सजायचा.

वंटास मुंबई; आज गणपती बाप्पाला नैवद्य म्हणून रोज काय मेजवानी बनवाल आणि गणेशोत्सव काळात तुमचे मेजवानीचे ताट वेगवेगळ्या पदार्थांनी कसे भराल यासाठी काही टिप्स देणार आहोत. चला तर मग, गणेशोत्सव स्पेशल काही रेसिपीज पाहुयात वंटास मुंबईच्या या खास सत्रात…

◆ पनीरची खीर
साहित्य : पनीर पाव किलो, दूध 2 लिटर, कॉर्नफ्लोअर 1 चमचा, केवडा इसेन्स पाव चमचा, साखर 1 वाटी, कदाम-पिस्ते 4 चमचे.paneer kheer pakwangali 520 031916045742

कृती : पाव किलो ताजे पनीर घेऊन त्याचे छोटे छाटे चौकोनी तुकडे करावेत. दोन लिटर दूध आटवायला ठेवा. त्यात 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून निम्मे होईस्तोवर आटवावे, नंतर साखर घालून एक उकळी येऊ द्या. साखर विरघळली की खाली उतरवून थंड करावे. नंतर त्यात पनीरचे तुकडे, केवडा इसेन्स घालून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. सव्‍‌र्ह करतेवेळी वरून बदाम पिस्ता घालून सव्‍‌र्ह करावे.

◆ ब्रेड स्टफ गुलाबजाम
साहित्य : खवा 200 ग्रॅम, सुका मेवा अर्धी वाटी, पीठी साखर 2 चमचे, ब्रेड स्लाइस 4-5, दूध अर्धी वाटी, तूप पाव वाटी, चांदी वर्ख सजावटीकरिता, बदाम-पिस्ते 2 चमचे.%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE %E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%A1 %E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1 %E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8 badam stuufed bread gulabjamun recipe in hindi %E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80 %E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF %E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0

कृती : 200 ग्रॅम खवा घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी सुका मेवा, 2 चमचे पिठी साखर घालून एकत्र करा हा झाला खव्याचा मसाला. मोठ्या ब्रेडच्या 4 ते 5 स्लाइस घेऊन त्याच्या कडा कापून घ्या. नंतर हे ब्रेड दूधात भिजवून पिळून घ्या व यात खव्याचा तयार मसाला घालून हाताने मुठीया बांधून मंद आचेवर साजूक तुपावर तळून घट्ट साखरेच्या पाकात घालून लगेच काढा, त्यावर चांदी वर्ख व बदाम पिस्त्याचे काप घालून सव्‍‌र्ह करा.

◆ टोमॅटो वडी
साहित्य : टोमॅटो 1 किलो, नारळाचा कीस 3 वाट्या, साखर अडीच वाट्या.53929324

कृती – टोमॅटो वाफवून त्याचा रस काढून घ्या. त्यात साखर व नारळाचा कीस मिसळून मिश्रण गॅसवर ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यावर खाली उतरवून त्यात पिठी साखर घाला. एका ताटाला तूप लावून मिश्रण त्यात ओतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा कापून खायला द्या.

◆ दुर्वामृत
गणपतीला मोदक आवडतो असे आपल्याला माहिती आहे, पण गणपतीसमोर आपण नेहमी दुर्वासुद्धा पाहतो, असे आपल्या लक्षात येईल. पूर्वीच्या काळी लोकांनी असं लिहून ठेवलं होतं की गणपतीला मोदक आवडायचे आणि ते खाऊन-खाऊन त्याचे पोट खराब होऊ नये म्हणून दुर्वासुद्धा खायचे.

साहित्य : दुर्वा २ वाट्या, पुदिन्याची पाने अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ 2 चिमूट, साखर चिमूटभर.Durvamrut

कृती : 2 वाट्या दुर्वा, अर्धी वाटी पुदिना, अर्धा लिंबाचा रस एकत्र करुन मिश्रण मिक्सरवर बारीक करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ व साखर घाला. साखरेचे प्रमाण मात्र मिठापेक्षा कमी ठेवा. नंतर हे मिश्रण गाळून फ्रीजमध्ये थंड करून प्यायला द्या.

दुर्वामृत हे एक हटके पेय आहे. पारंपरिक पंचामृत तीर्थाला हा योग्य पर्याय आहे. हे पेय तुम्ही पाहुण्यांना मूसच्या रूपात देखील सव्‍‌र्ह करू शकता.

◆ बटाट्याची जिलेबी
साहित्य – बटाटे पाव किलो, मदा 50 ग्रॅम, साखर 2 वाट्या, लिंबाचा रस अर्धा चमचा, केशर पाव चमचा.10429402 10204857277009532 4794173547596582002 n

कृती – पाव किलो बटाटे उकडून सोलून किसून घ्या. नंतर त्यात 50 ग्रॅम मैदा मिसळा. थोडे पाणी घालून भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पीठ भिजवा. एका दुसऱ्या भांडय़ात एकतारी साखरेचा पाक बनवून ठेवा. पाकात थोडा लिंबाचा रस व केशर घाला. फ्रायपॅनमध्ये तूप घालून गरम झाल्यावर त्यात बटाट्याच्या पिठाच्या नेहमीप्रमाणे जिलब्या काढून घ्या. नंतर लगेच पाकात घालून अर्धा मिनिटे ठेवून बाहेर काढा व सव्‍‌र्ह करा.

◆ श्रीखंड-खजूर लाडू
साहित्य – 1 वाटी दही, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी किसलेले काजू-बदाम, तुपात भाजलेले खजूर, चारोळी, केशर, जायफळ-वेलची पावडर

कृती – प्रथम गॅस पेटवून कढईत दही, दूध, साखर एकत्र टाकून हलवावे. या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत हलवावे. नंतर त्यात काजू-बदाम पावडर, चारोळी, दुधात भिजवलेले केशर टाकून हलवावे. हे मिश्रण कढईपासून सुटू लागले की कढई गॅसवरून उतरवून हलवावे. जायफळ-वेलची पूड व खजूर घालून गार होण्यापूर्वी तुपाचा हात लावून त्याचे लाडू बनवावे.photo

नवीन गोष्टी नेहमीच माणसाला आनंद देतात, तसेच बाप्पाला खुश करण्यासाठी भक्तांनी केलेल्या अशाच मेजवान्या गणेशोत्सवात एक वेगळीच मजा निर्माण करतात. कश्या वाटल्या आमच्या ह्या वंटास रेसिपीज हे आम्हाला जरूर कळवा, तसेच गणेशोत्सव काळात तुम्ही काय स्पेशल करताय हेही आपल्या वंटास सोशल मीडियावर शेअर करा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments