आपलं शहर

शाळा सुरू होणार! तुमची मुलं शाळेत पाठवण्याआधी ‘या’ गोष्टींची चौकशी करा

शाळा कधी सुरू होणार, अखेर यावरचे उत्तर मिळाले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाकडून याबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईत लवकरच शाळा अंशतः सुरू होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वर्गाच्या शाळा सुरू न करता फक्त इयत्ता 9 ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. मुख्य म्हणजे कोरोनाबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती लक्षात घेता, विद्यार्थी स्वेच्छेने व पालकांच्या संमतीनेच शाळेत जाऊ शकणार आहेत. आता कोरोनात्तर काळात 9 वी ते 12 वी चे वर्ग कसे सुरू होणार, यावर केंद्राने काय गाईडलाईन्स दिले आहेत, पाहुयात…

काय आहेत केंद्राच्या गाईडलाईन्स आणि कशी होणार सुरू शाळा:

● शाळा सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक हा कोणत्याही लक्षण नसलेला व्यक्तीला शाळेत येण्यास परवानगी असणार आहे.
● मास्क, सॅनिटायजरचा वापर शाळेत वेळोवेळी खबरदारी म्हणून केला जाणार आहे.
● शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाण्यासाठी 6 फूट अंतर राखावे. यासाठी वर्ग खोलीतसुद्धा त्यानुसार आसनव्यवस्था करण्यात यावी, अशी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे.
● बाहेरील व्यक्तीस शाळेत येण्यास मनाई असणार आहे.
● लायब्ररी, मेस, कँटिनमध्येसुद्धा योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
● ट्रान्सपोर्टेशनमध्ये बस, वाहन पूर्णपणे सॅनिटाइज केले जावे, अशा सूचना केंद्राने केल्या आहेत.
● कंटेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करण्यास परवानगी नाही.
● शिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या शिक्षण, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला शाळेत येण्यास परवानगी नसणार आहे.
● शाळा सुरु करण्याआधी संपूर्ण परिसर, वर्ग, प्रयोगशाळा, टीचिंग परिसर एक टक्के सोडियम हायपोक्लोराइटने सॅनिटाईज करावा लागणार आहे.
● विशेषत: ज्या पृष्ठभागावर वारंवार स्पर्श केला जातो तो भाग स्वच्छ करावा.
● शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतर 6 फूटांपेक्षा जास्त असावे.
● विद्यार्थी पेन्सिल, पेन, पुस्तक, टिफिन आणि पाण्याची बाटली यासारख्या गोष्टी शेअर करणार नाहीत, यावर शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे.
● शाळेचा प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी गेट वेगळे असले पाहिजेत. त्याच वेळी शाळेत प्रवेश करताना गेटवर थर्मल स्कॅनिंग आणि हँड सॅनिटायझरची एक प्रणाली असावी.
● विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही नेहमी मास्क घालावं लागणार आहे. शाळेतून वाहतुकीची सुविधा असल्यास दररोज वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन रोज सॅनिटाईज केले पाहिजे.
●ज्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे नाहीत, असे विद्यार्थी, शिक्षक, पर्यवेक्षक शाळेत जाऊ शकतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोरोना काळात ज्या शाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या त्या पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्वच्छ आणि डीप सॅनिटाईझ केल्या जाणार आहेत. या कालावधीत केवळ 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत बोलावले जाईल. शाळेत बायोमेट्रिक हजेरीऐवजी शाळा प्रशासनाकडून संपर्क कमी हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते.

फक्त तारीख बदलू शकते; पण परीक्षा होणार; युजीसीकडून नवी नियमावली जाहीर…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments