फेमस

अनेकांचा पर्दाफाश करणाऱ्या कंगनावर दाखल होऊ शकतो गुन्हा…

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात स्वइच्छेने पडलेल्या कंगनाने अनेक संकटे स्वत:वर ओढावून घेतली आहेत. बॉलिवूडमध्ये घरानेशाही चालते, त्यातच बॉलिवूडमधील अनेक लोक ड्रग्जचं सेवन करतात आणि त्यांची संपूर्ण यादी माझ्याकडे आहे, असं ठणकावून सांगणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

मुंबईत कंगना आल्यानंतर सुशांतसिंह राजपूतच्या घटनांना नवं वळण येईल, असं अनेकांना वाटलं होतं. तिने म्हटल्याप्रमाणे ड्रग्ज माफियांची सगळी यादी ती पोलीस तसेच NCB कडे देईल, मात्र तसं काहीही झालेलं पाहायला मिळालं नाही. NCB नेदेखील कंगनाची मदत घेणं योग्य समजलं नाही. या सगळ्यात कंगना रानौतचीही नार्को टेस्ट झाली असती, मात्र तसं काहीही झालेलं पाहायला मिळालं नाही.

आपल्याकडे सर्व पुरावे असूनही स्वत:हून ती माहिती पोलीस अथवा तपास यंत्रणेला दिली नाही तर भारतीय दंड संहितानुसार कलम 176 आणि कलम 220 व NDPS कायद्यानुसार संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. जर पोलीस अथवा NCB ने ठरवलं तर कंगनावर या प्रकारे गुन्हा दाखल होऊ शकतो.

मुंबईतील कंगनाच्या घरावर बीएमसीने केलेल्या कारवाईवर भाजपातील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला. यासोबतच सुशांतच्या बहिणीनेही बीएमसीच्या विरुध्द आवाज उचलला होता. यात बिहारी बाबू चिराग पासवान यांनीही उडी घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं मत व्यक्त केलं होतं. इतकच नाही तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीदेखील कंगनाची भेट घेतली. सोबतच त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं मत मांडलं होतं. या सगळ्यांना नाराज करून ती गेली, असं मत शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकांनी व्यक्त केले आहे. (A crime can be filed against Kangana who exposes many)

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments