खूप काही

सत्तेचा माज की शक्तीप्रदर्शन?

सुरुवात झाली, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आणि मध्ये उभे ठाकले कंगना रानौतचे प्रकरण! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आपण या आधीही अनेक राजकारणाचे गुलाल उधळलेले अनुभवले असेल. त्यात अनेक राजकीय व्यक्तींनी भाष्य केले, सरकार, मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले गेले आणि बरेच काही. बॉलीवूड मधील नेपोटीझम, डिप्रेशन, ड्रग असे अनेक लपलेले विषय सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बाहेर आले. गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वरही अनेक आरोप लावले गेले आणि शेवटी ड्रग प्रकरणात रियाला अटक झाली. मुंबई ही आपली कलामंच आहे. इथे रोज नवनवीन नाट्ये होत असतात. कधी राजकीय पक्षांचे तृणमूल तर कधी मुंबईच्या समस्या. एका पाठोपाठ एक अशी नाट्यमय कलाकारांची गाडी सुरूच असते.

महाराष्ट्राची राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईवर सगळ्यांचे लक्ष असते. कारण देशाची सत्ता मुठीत ठेवायची असेल तर दिल्ली आणि महाराष्ट्राची सत्ता हातात मिळवायची असेल तर मुंबई मुठीत असणे म्हणजे अत्यावश्यक गोष्ट!

मुठीत ठेवणं म्हणजे नेमकं काय करावं लागणार?

सत्तेवर असलेल्यांनी जनतेची करावी सेवा हे उत्तर मिळत. पण सत्ता हातात येताच, “जनतेच्या हितासाठी मी बांधील” असे म्हणणाऱ्यांचे वासे फिरतात. याच मोठं उदाहरण म्हणजे, अभिनेत्री कंगना रानौत हिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने आपसूक केलेली कारवाई. स्वतःच स्पष्टीकरण दयायला गुन्हेगाराला तरी मोजका वेळ दिला जातो. कंगणाच्या आवाहनाला ती मुंबईत दाखल व्हायच्या आधी सडेतोड उत्तर मिळाले.

निश्चितच, मुंबईला पाकिस्तानची उपमा देणं म्हणजे खाल्लेल्या मिठाला न जागणे. अहो रात्र मेहनत करणाऱ्या आपल्या मुंबई पोलिसांबद्दल अनादर करणारे भाष्य करणे हे देखील चुकीचेच परंतु, ज्या प्रकारे तिच्या जवळपास 45 कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या कार्यालयावर कारवाई झाली आणि अप्रत्यक्षरित्या तिच्यावर सत्तेचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले हे साफ चुकीचे होते. ही पहिली चूक नव्हे, या आधीही आर जे मालिशका (RJ Malishka) लाही पलीकडेचा चांगलाच धसका मिळाला आहे ते सुद्धा पालिके विरोधात बनवलेलं गाणं आणि त्याला मिळालेल्या लोकांचा भरगोस प्रतिसाद म्हणून. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी सुद्धा या कृतीवर नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते तर टीकेचा भडिमार हा सरकारवर करतच आहेत. जनताही उघड्या डोळ्यांनी सगळं पाहत असून, त्याचे पडसाद लवकरच उमटतील, अस दिसतंय.

या संपूर्ण लेखाचे थाट मांडायचे उद्धिष्ट इतकेच की, चूक तिथे चूक बोललं पाहिजे, आक्षेप हा घेतलाच पाहिजे. सत्तेवर असले तरी आमच्यासारख्या मायबाप जनतेनेच आपल्याला तो हक्क दिला आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. जनता सगळं पाहात आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. विरोधी पक्षाची भूमिका जनतेला घ्यायला मजबूर करू नका म्हणजे झालं. थोडा वेळ देऊन, योग्य ती कारवाई केली असती तर तुमची प्रतिमा जपली गेली असती. पण कदाचित मानाची खुर्ची तुमच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला योग्यतेचा विसर पडला असावा.

जेव्हा कंगना मुंबईत दाखल होते तेव्हा?

Sushant singh Rajput : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं मराठी कनेक्शन…

मातोश्रीला धमकी देणाऱ्या दाऊदला पाकिस्तान का बाळगतय?

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments