आपलं शहर

बॉयफ्रेंडवर केला खोट्या बलात्काराचा आरोप, गर्लफ्रेंडला बसला मोठा दणका…

आजवर महिलांवर अनेक अत्याचार झाले, काहींना त्याची शिक्षा झाली तर काही मोकाट सुटले आहे. महिलांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. पण तुम्ही कधी ऐकलंय का, ज्यांच्यासाठी कायदा बनविला, त्यांनीच त्या कायद्याचा गैरवापर केलाय. “कायदा महिलांच्या बाजूने असतो” हे वाक्य आपण ऐकले असावेच; पण याच गोष्टीचा फायदा घेत, एका मुलीने आपल्या प्रियकराविरोधात बलात्काराची बोगस फौजदारी तक्रार दाखल केली. आता बलात्कारासारख्या मोठ्या गुन्ह्याला नक्कीच समोरच्या आरोपीला ठोस शिक्षा होणार होती हे नक्कीच, पण सुदैवाने सत्य बाहेर आले आणि खोटी तक्रार दाखल केलेल्या मुलीला मुंबई उच्च न्यायालयाने 25 हजारांचा दंड सुनावला. नक्की काय होत प्रकरण, पाहुयात सविस्तर… महिलांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याचा गैरवापर करणं एका तरूणीला चांगलंच महागात पडलं आहे. केवळ घरच्यांच्या दबावामुळे आपल्या प्रियकराविरोधात बलात्काराची बोगस फौजदारी तक्रार दाखल करणाऱ्या तरुणीला मुंबई उच्च न्यायालयाने 25 हजारांचा दंड सुनावला आहे. येत्या चार आठवड्यात महाराष्ट्र पोलीस विकास निधीमध्ये दंडाची रक्कम जमा करा अन्यथा फिर्याद कायम राहिल, असेही खंडपीठाने सुनावले आहे. मुलीने आपली बाजू मांडत, घरच्यांनी दबाव आणला म्हणून बलात्काराची तक्रार दाखल केली, हा दावा केला, परंतु मान्यच होऊ शकत नाही. असं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवत दंड सुनावला आहे.

प्रकरणाला सुरुवात कशी झाली

प्रियमित्राने नशाखोरी करून माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रात तरुणीने मार्च महिन्यात नालासोपारा पोलीस ठाण्यात केली होती. पुढे पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र अचानक जुलै महिन्यामध्ये, तक्रार रद्द करण्यासाठी तरूणीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. या याचिकेमध्ये, माझे आणि तक्रार केलेल्या मुलाचे प्रेमसंबंध आहेत, परंतु आमच्या घरच्यांना ते कदापि मान्य नव्हते, त्यामुळे माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला खोटी तक्रार दाखल करायला भाग पाडले, असा दावा केला आहे. सरकारी वकिलांनी मात्र या याचिकेला पूर्णतः विरोध केला होता. पोलिसांनी एवढे दिवस या प्रकरणाचा तपास करत आरोपपत्रही तयार केलं आहे. त्यामुळे आता न्यायालयाने तक्रार रद्द केली, तर तक्रारदाराला मोठा दंड करावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली. न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठानं याबाबत सहमती देत संबंधित फिर्याद रद्द करण्याचे आदेश देताना पंचवीस हजार रुपये दंड भरा आणि तक्रार रद्द करा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रेमसंबंधदेखील किती महागाचे पडू शकतात, हे उदाहरण आता समोर आलं आहे.

हेही वाचलत का…

Inside The Crime |01| ती, अचानक तिच्या मागे कसलातरी स्पर्श झाला, ती थबकली आणि… Inside The Crime |02| अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर आज तो पुन्हा आला होता; परत कोणाची तरी साडी जाळणार होता… Inside The Crime |03| बायकोने साखर नाही दिली आणि एचडीएफसी बँकेच्या चेअरमनचा खूण झाला… Inside The Crime | 04 | सीटखालच्या रक्त लागलेल्या रुमालमुळे सिध्दार्थ संघवीच्या खून्याचा शोध लागला… Inside The Crime |05| शोध 23 वर्षे न सापडलेल्या घराचा… Inside The Crime| 23 वर्ष न सापडलेल्या घराचा शोध अखेर 32 दिवसात लागाला…!

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments