कारण

मुंबईतल्या सुशांतप्रकरणाच्या जोरावर बिहारचे DGP लढणार आमदारकीची निवडणूक?

बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ते बिहारमधील आगामी निवडणुक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर बेताल वक्तव्य करणारे गुप्तेश्वर पांडे यांचे नाव यापूर्वी बर्‍याच वेळा चर्चेत राहिले आहे. याच पांडे यांनी मुंबई पोलिसांवरही बेताल वक्तव्य करण्याची संधी सोडली नव्हती.

गुप्तेश्वर पांडे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत नशिब आजमावण्याच्या प्रयत्न करणार आहेत, ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरतील, अशा अनेक बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात गुप्तेश्वर पांडे यांच्या कार्याचा उल्लेख व गौरव आहे.

गुप्तेश्वर पांडे यांचा हा व्हिडिओ भारतीय पोलिस फाऊंडेशनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडल @IPF_ORG वर शेअर केला आहे. भारतीय पोलिस फाऊंडेशनने या व्हिडिओवर टीका केली असून ते इतर अधिकाऱ्यांना चुकीचे असल्याचे इतर अधिकाऱ्यांकडून म्हटलं जातय, एक वादग्रस्त ठरलेल्या DGP चे कौतूक अशाप्रकारे एका राज्याच्या कार्यकारी अकाऊंटवरून कसे शेअर केले जाऊ शकते, असा सवालही अनेकांनी विचारला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर एका राज्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजयकीय नेत्याप्रमाणे वक्तव्य केल्यामुळे गुप्तेश्वर पांडे मोठ्याप्रमाणात ट्रोलदेखील झाले होते. तेव्हापासूनच ते भाजपचे उमेदवार असून स्वेच्छानिवृत्ती घेऊन लवकरच ते राजकारणात प्रवेश करतील, अशा चर्चांनादेखील उधाण आलं होतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments