आपलं शहर

थोडक्यात आवरलं; नाहीतर धारावीत 1898 सारखी महामारी आली असती…

आपल्या भारतातील महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. बिकट परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून सरकार काळजी घेत आहे, परुंतु आर्थिक स्थितीचा आलेख वाढवणारी आपली मुंबई; कोरोना व्हायरसची मोठी शिकारी बनत असल्याचे रोज येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे आणि ह्याला जास्त कारणीभूत ठरू शकल्या असत्या धारावी सारख्या झोपडपट्ट्या…
मुंबईची धारावी झोपडपट्टी वाढवु शकते कोरोनाचे क्षेत्र
सगळ्यांची मायानगरी असणाऱ्या मुंबईत श्रीमंतातील श्रीमंत आणि गरीबातील गरीब मुंबईकर राहातो. मुंबई कुणालाच उपाशी ठेवत नाही म्हणून ती ग्रेट आहे. श्रीमंतांचे विमान गरीबाच्या झोपडीत कोरोना व्हायरस घेऊन आला. विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानल्या जाणाऱ्या धरावी झोपडपट्टीलादेखील कोरोनाने आपल्या क्षेत्रात घेतले आहे.
आता मुंबईसाठी सर्वात धोक्याची ही बातमी आहे…
कारण एका दहा बाय दहाच्या झोपडपट्टीत 8 ते 10 माणसे राहतात. एका झोपडीचा दरवाजा पुढील चार घरांना लागून आहे. म्हणजे जर कोरोनाची लागन तेथील एका व्यक्तीला झाली तर अख्खी धरावी कोरोनाच्या आहारी जाऊ शकते. कोरोनाने धारावीत शिरकाव केला आहे. धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. अशीच एक परिस्थिती प्लेग आजारामुळे मुंबईची झाली होती.
प्लेग आणि आताची धारावी…
वंटास टीमने याआधीच मुंबईत पसरलेल्या प्लेगबद्दल आपल्या वाचकांना माहिती दिली होती. आज ज्याप्रकारे कोरोनाने मुंबईकर हैराण झाले आहेत, त्याचप्रकारे 1898 साली प्लेगच्या साथीने मुंबईकर हैराण झाले होते. मुंबईच्या उघड्या गटरांपासून या प्लेग आजाराची निर्मिती झाली होती. या आजाराचे मुंबईत अनेक बळी गेले होते. कोल्हापुर मात्र ह्याला अपवाद ठरला. प्लेगला कोल्हापूरसमोर हार मानावी लागली होती. त्याच कारण होत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची दूरदृष्टी.

आता तुम्ही म्हणाल, काय संबंध प्लेग आणि आताच्या कोरोनाशी झगडत असलेल्या मुंबईच्या धारावी झोपडपट्टीचा?

तर 1898 हा काळ अनेक अशिक्षित लोकांचा होता. आता जस सोशल डिस्टनसिंग पाळलं जातंय तस त्याकाळी काही नव्हतं. आजारापासून बचावण्यासाठी काय करावे हे देखील तेव्हा लोकांना कळत नव्हते. प्लेगवर मात करायला परराष्ट्रतून उपचारासाठी डॉक्टर बोलावण्यात आले होते. आता प्लेग आणि कोरोना उपाययोजनेत जरी बदल असला तरी परस्थिती काहीशी सारखी आहे.

वाढता उन्हाळा, त्यामध्ये पत्र्याच्या झोपडपट्ट्या आणि त्यात राहणारे असंख्य लोक. या झोपडपट्ट्यांमध्ये स्वतंत्र शौचालय नाही. पन्नासहून अधिक घरांसाठी एकच सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे कितीही दिवसभर सोशल डिस्टसिंग पाळण्याचा प्रयत्न केला, तरी सकाळी रांगेत उभं राहावाच लागतं. तिथं मात्र सर्व नियमांचे दरवाजे बंद होतात आणि त्याला काही पर्यायही नाही. प्रत्येक घरात पाण्याचा नळ नाहीये. त्यामुळे सकाळी पाणी आल्यानंतर सार्वजनिक नळावर जावं लागतं आणि ही गर्दी टाळता येणारी नाही.
 
अशी करू शकतो उपाययोजना…
धारावीची लोकसंख्या पाहता त्यांचे सुटसुटीकर करणे सध्याच्या घडीला आवश्यक आहे. आज अनेक शाळा, कॉलेज बंद आहेत तेथे त्यांची राहायची सोय केली पाहिजे. यात अन्न पाण्याची सोय सरकारसोबत अनेक खाजगी समाजकार्य करणाऱ्या संस्थादेखील करतील.
मुंबई आणि पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातल्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापुरात काही संकल्पना राबवल्या होत्या. त्यामुळे प्लेगची साथ कोल्हापुरात काहीच करू शकली नव्हती. त्यासाठी कोल्हापूर शहर खाली करण्यात आलं होतं. तिथे संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण केलं होतं. असं जर धारावीत करण्यात आले तर नक्कीच कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होईल. तिथे राहण्याच्या अर्ध्या लोकांची जर दुसऱ्या जागी व्यवस्था करण्यात आली तर हे ही योग्य राहील. त्याने संसर्ग होणार नाही. टेस्ट करून ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना वेगळं केलं पाहिजे.

अशा वेगवेगळ्या प्रकारे योग्य विचार करून जर धारावीची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या तर 1898 च्या प्लेग आजारामुळे झालेली मानवहानी टाळता येईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments