फेमस

CBD OIL आणि श्रद्धा कपूरचं कनेक्शन, ऑइलची खरेदी केली तर होणार जेल ?

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत चालले आहे. बॉलीवूडच्या बड्या स्टारच्या पडद्या मागच्या कहाणी हळूहळू जगजाहीर होत आहे. नुकतेच, सुशांतसिंग प्रकरणात बॉलीवूड क्वीन दीपिका पादुकोन, सारा अली खान, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर यांना एन सी बी कडून समन्स बजावण्यात आले. ड्रग प्रकरणात या अभिनेत्रींची नावे समोर आली असून आता त्यांची चौकशी होणार आहे. ड्रग सोबत सीबीडी ऑइल हे देखील आपण टेलिव्हिजन पाहताना व बातम्या वाचताना ऐकले असावे. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि जया साहा यांच्या व्हाट्सएप चॅटमध्ये, श्रद्धा कपूरच्या संवादात सीबीडी ऑईलचा उल्लेख झाला होता, जो आता एक वादग्रस्त चर्चेचा मुद्दा ठरला. नक्की हे सीबीडी ऑइल काय आहे आणि त्याला धरून आपला कायदा काय सांगतो, पाहुयात..

एनसीबीने पुन्हा मिळवलेल्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सीबीडी ऑइल चा उल्लेख केल्याने सर्वसामान्यांना तणाव निर्माण झाला आहे. सीबीडी ऑइल सहजपणे ऑनलाइन उपलब्ध आहे आणि बरेच लोक डॉक्टरांची कोणतीही प्रिस्क्रिप्शन सादर न करता ते विकत घेऊ शकतात. आता बाहेर आलेल्या सीबीडी ऑइल या प्रकरणामुळे, चित्रपट उद्योगातील अधिकाधिक लोक एनसीबीच्या रडारखाली येत आहेत.

काय आहे सीबीडी ऑइल (CBD Oil)?

कॅनॅबिडिओल (Canebidiol) म्हणजेच सीबीडी ऑइल. यामध्ये, औषधी गुणधर्म असतात आणि त्याचा उपयोग वेदना कमी करण्यासाठी केला जातो. तसेच, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी देखील केला जातो. हार्वर्डच्या संशोधनानुसार, सीबीडी हा मारिजुआनाचा एक घटक आहे म्हणजेच एक प्रकारचे मादक द्रव. मारिजुआनाला कॅनॅबिस या नावाने देखील ओळखले जाते. मुख्यत्वे मारिजुआना हे वैद्यकीय किंवा करमणुकीच्या उद्देशाने वापरल्या जाणार्‍या कॅनाबिस वनस्पतीपासून बनविलेले एक औषध आहे. सीबीडी ऑइल कॅनाबिस वनस्पतीचा 40% उतारा आहे. खरं तर, सीबीडी ऑइल भारत आणि इतर देशांमध्येही कायदेशीर आहे. अहवालानुसार सीबीडी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक हा भारत देश आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 2019 च्या अभ्यासानुसार अंदाजे 2.8 टक्के भारतीय लोकांनी गांजाचे सेवन केले आहे. जगातील सर्वात जास्त गांजा सेवन करणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली आणि मुंबई आहेत.

कॅनॅबिडिओल (सीबीडी ऑइल) विहित प्रमाणात घेतल्यास आरोग्यविषयक समस्या दूर करण्यास मदत करते. हे चिंता, नैराश्य, सांधेदुखी, निद्रानाश आणि काही हृदय-संबंधित समस्यांना देखील मदत करते. त्यामुळे सामान्य देखील औषध म्हणून याचा वापर करू शकतात.म्हणूनच सीबीडी तेलाचा वापर बेकायदेशीर नसावा असा दावा केला जात आहे आणि त्यामुळे तुरूंगवास देखील होण्याचा प्रश्न येथे येत न्हाई. एनडीपीएस (NDPCS) कायद्यातील मार्गदर्शक सूचनांविषयी खात्री बाळगता सीबीडी ऑइलचा वापर करायचा असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments