आपलं शहर

CSKvsMI : आतापर्यंत चेन्नईपेक्षा मुंबई इंडियन्सचे रेकॉर्ड्स लय भारी!

आजपासून आयपीएल लीग सुरु होत आहे. तब्बल 53 दिवस रंगणाऱ्या आयपीएलचं हे 12वं हंगाम असणार आहे. इतिहासाप्रमाणेच गतविजेता संघ आणि गत उपविजेत्या संघांच्या सामन्यापासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएल म्हटलं की कट्टर प्रतिस्पर्धी माणले जाणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन संघ डोळ्यासमोर येतात. आज याच दोन संघामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे.

आयपीएल सुरु होण्या आधीच मुंबई आणि चेन्नईच्या फॅनमध्ये झुंबड उडालेली असते. इतर कोणते संघ असो वा नसो, मात्र धोनीचे चाहते चेन्नईच्या बाजूने आणि रोहितचे चाहते मुंबईच्या बाजूने सपोर्ट करत असतात, यात काहीदा मराठी बाणा, महाराष्ट्र बाणा, असे मुद्देही येत असतात. नेमकं या दोन संघांमध्ये आतापर्यंत कोणता संघ जास्त विजयी सलामी देऊ शकला आहे, हेच आज पाहाणार आहोत.

आतापर्यंत आयपीएलचे 11 हंगाम झाले आहेत. यापैकी चेन्नई सुपर किंग्स 10 वेळा खेळला आहे, तर मुंबई इंडियन्स संघ 11 वेळा खेळला आहे. चेन्नई आणि मुंबई हे दोन संघ आतापर्यंत 28 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी मुंबईने 17 लढतीत विजय मिळवला आहे, तर चेन्नईने 11 सामने जिंकले आहेत.

2019 मध्ये झालेल्या एकुण सामन्यांमध्ये मुंबई आणि चेन्नई हे संघ 4 वेळा आमनेसामने भिडले होते, या चारही लढतीत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर 2018 मध्ये झालेला चेन्नई विरुध्द मुंबई यांच्यातला सामनादेखील मुंबईच्या नावावर आहे, त्यामुळे 5 वेळा बाजी मारलेल्या मुंबईला आजच्या सामन्यात हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.

आतापर्यंत मोठ्या फरकाने ज्या संघाने विजय मिळवला, त्याच मुंबईचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सने 2017 मध्ये झालेल्या दिल्ली विरुध्दच्या सामन्यात 146 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला आहे.122 सामन्यात तब्बल 170 विकेट मलिंगाने घेतले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या अलझारी जोसेफ याने हैदराबादविरुध्दच्या सामन्यात सर्वाधिक म्हणजे 12 धावांत 6 फलंदाजाना बाद केलं आहे.

आतापर्यंतचा इतिहास हेच सांगतो की मुंबई संघ चेन्नईपेक्षा आग्रेसर आहे, मात्र आज होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहाणे गरजेचे असेल.

मुंबई टीम

रोहित शर्मा – सामने 188, रन4898, विकेट15
किरॉन पोलार्ड – सामने 148, रन, 2755, विकेट56
हार्दिक पंड्या – सामने 66, रन 1068, विकेट42
जसप्रित बुमराह – सामने 77, रन 35, विकेट82
आदित्य तारे – 35, रन 339, विकेट 0,
अनमोल सिंह – सामने 0, रन 0, विकेट 0
अनुकूल रॉय – सामने 1, रन 0, विकेट 1,
क्रिस लिन – सामने 41, रन 1280, विकेट 0,
धवल कुलकर्णी – सामने 90, रन 97, विकेट – 86,
दिग्वीजय देशमुख – सामने 0, रन – 0, विकेट – 0,
ईशान किशन – सामने 37, रन – 695, विकेट – 0,
जेम्स पॅटिंसन – सामने 122, रन – 88, विकेट – 17
जयंत यादव – सामने 12, रन 6, विकेट5,
कृनाल पांड्या – सामने 55, रन 891, विकेट 40
मिशेल मैक्क्लेनाघन – सामने 56, रन 85, विकेट 170,
मोहसिन खान – सामने 0, रन 0, विकेट 0
नाथन कोल्टर-नील – सामने 26, रन 52, विकेट 36
प्रिन्स बलवंत – सामने 0, रन 0, विकेट 0,
क्विंटन डी कॉक – सामने 50, रन 1456, विकेट 0
राहुल चहर – सामने 16, रन 15, विकेट 15,
सौरभ तिवारी – सामने 81, रन 1276, विकेट 0,
शेरफेन रदरफोर्ड – सामने 7, रन 73, विकेट 1,
सूर्यकुमार यादव – सामने 85, रन 1548, विकेट 0
ट्रेंट बोल्ट – सामने 33, रन 12, विकेट38

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments