फेमस

CSK vs RR : संजू सॅमसनचा खेळ पाहून सचिन खूष, तर गंभीर बोलला…

संजू सॅमसनने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आपल्या खेळाकडे वेधून घेतले आहे. IPL -13 च्या चौथ्या सामन्यात सॅमसनने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध अर्धशतक झळकावले आणि त्यामुळे संघाला 216 धावा करता आल्या. सॅमसनने 32 चेंडूंमध्ये तब्बल 74 धावा केल्या, ज्यात 1 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. ज्यामुळे सगळीकडून त्याचे कौतूक केले जात आहे. सचिन तेंडुलकरने सॅमसनच्या शॉटचे कौतुक केले तर गौतम गंभीरने त्याला भारताचा सर्वोत्कृष्ट युवा फलंदाज म्हणून घोषित केले आहे.

सचिनने ट्विट केले की, “सॅमसनने फलंदाजी करताना जो शॉट मारला तो पूर्णपणे स्पष्ट होता. सर्व शॉट्स क्रिकेटचे सर्वोत्कृष्ट शॉट होते. “एवढेच नाही तर सचिनने लुंगी नागीदीचे कौतुकही केले आणि लिहिले की,” त्याने स्मार्ट गोलंदाजी करुन सॅमसनला बाद केले. “गौतम गंभीर म्हणाला – संजू सॅमसन भारताचा सर्वोत्कृष्ट विकेटकीपर फलंदाज आहे. नाही, पण भारताचा सर्वोत्कृष्ट युवा फलंदाज! वादासाठी कोणी? ”

सॅमसनचे अर्धशतक हे IPL-13 मधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. मार्कस स्टोइनिसने सॅमसनच्या आधी 20 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments