फेमस

DC vs KXIP …म्हणून पंजाबने 19 वर्षाखालील युवा स्टार रवी बिश्नोईला डेब्यू केलं!

  1. नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीगच्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे संघ आज आमनेसामने उभे आहेत. या सामन्यादरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

नवीन कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ यंदाचा हंगाम सुरू करत आहे. तथापि, पहिल्याच सामन्यात केएल राहुलने कॅरेबियन संघाचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या जागी त्याचा सहकारी निकोलस पूरणचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.

इतकंच नाही तर केएल राहुलने या सामन्यात अंडर 19 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा युवा फिरकीपटू रवी बिश्नोईलाही पदार्पण करण्याची संधी दिली. यावर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणार्‍या अंडर19 वर्ल्ड कपमध्ये रवी बिश्नोईने शानदार गोलंदाजी करत तब्बल 17 गडी बाद करून संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं होतं.

yashashvijaiswal 1577547665

बिश्नोईसाठी पंजाबने 2 कोटी खर्च का केले?
रवी बिश्नोईला किंग्ज इलेव्हन पंजाबने2 कोटींना विकत घेतले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीत बरेच व्हेरिएशन आहेत. तो फक्त लेगस्पिन करत नाही, तर त्यासोबतच गुगली आणि फ्लिपर्स टाकणेसुध्दा पसंत करतो. IPL च्या आपल्या पहिल्याच सामन्यात खेळण्याची संधी मिळणे, हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

रवी बिश्नोईला स्मिथची विकेट घ्यायची आहे. अलीकडेच रवि बिश्नोईने एका मुलाखतीत सांगितले की, या स्पर्धेत स्टीव्ह स्मिथची विकेट त्याला घ्यायची आहे. स्वत:ची कारकिर्द गाजवण्यासाठी रवी बिश्नोई नक्कीच प्रयत्न करेल.

CSKvsMI : आतापर्यंत चेन्नईपेक्षा मुंबई इंडियन्सचे रेकॉर्ड्स लय भारी!

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments