फेमस

खरंच ‘टायगर 3’ च्या शूटींगसाठी सलमानने आकारले 100 कोटी ? पहा सत्यता !

बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान नेहमीच लाईम लाईट मध्ये असतो. लॉकडाऊनच्या काळातही आपल्या स्टायलिश अदांनी त्याने आपल्या चाहत्यांना प्रेमात पाडले होते. नुकतीच केंद्र सरकारने चित्रपट शूटिंगसाठी परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. सलमान खानने अ‍ॅक्शन-थ्रिलर अश्या “टायगर 3” या चित्रपटाची घोषणा केली आहे. या एका चित्रपटासाठी सलमान खानने अवाढव्य रक्कम आकारली आहे याच बद्दल माहिती आपण आज वंटास मुंबईच्या या खास रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत.

सुरुवाती पासून अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची सुपरहिट जोडी टायगर चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यांच्या हटके अभिनयाला प्रेक्षक नेहमीच पसंती देत राहिले. 2012 मध्ये आलेल्या “एक था टायगर” या सिनेमाने लोकांची चांगलीच मने जिंकली आणि चित्रपटाने करोडोंची कमाई केली. पुढे 2017 मध्ये “टायगर जिंदा है” हा चित्रपट आला आणि जवळपास 600 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसमध्ये केली. आता “टायगर 3” ची घोषणा करण्यात आली आणि प्रेक्षक आता आतुरतेने चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहे.

“टायगर 3” हा चित्रपट साइन करून संपूर्ण बॉलीवूड मध्ये सलमान खानने एक नवा विक्रम गाजवला आहे. सलमानने या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी म्हणजे 1 अब्ज रुपये मानधन घेतले आहे. होय, आपल्याला विश्वास बसत नसेल पण हे खरे आहे. सलमान खानच्या या मानधनाने बॉलीवूडमध्ये मानधनाचा नवा विक्रम नोंदविला आहे. एव्हढेच नाही तर, चित्रपटाच्या नफ्यामध्येही सलमान खान काही हिस्सा घेणार असल्याची बातमी आहे.

यशराज फिल्मच्या बॅनरखाली “टायगर 3” हा चित्रपट बनत आहे. बॉलीवूडच्या इतिहासात या चित्रपटाचे बजेट सर्वाधिक असून चित्रपटासाठी 200 ते 215 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी 20 ते 25 कोटींचे बजेट निश्चित केल्याचेही सांगितले जात आहे. “टायगर 3” चे शुटींग 6 ते 7 देशात होणार आहे. तसेच एका आंतरराष्ट्रीय स्टंट टीमसह केले जाणार आहे. जगभरात हे संपूर्ण शुटींग होईल. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments