आपलं शहर

डोंबिवलीत राहणे पाप आहे का?

फक्त काही दिवसांपासूनच अनलॉक सुरु झालाय. त्यामुळे अनेक लोकांनी कामावर निघण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक कंपन्या, दुकाने, उद्योगधंदे सुरु झाले आहेत, त्यासाठी मुंबईतील आणि मुंबई बाहेर राहाणारा व्यक्ती प्रवासाला लागला आहे. मुंबई उपनगरात राहाणाऱ्या नागरिकांची संख्या यात जास्त आहे.

डोंबिवली हे शहरदेखील त्यातलाच एक भाग आहे. डोंबिवली फास्ट हे अनेक कारणांनी प्रसिध्द आहे. आतादेखील अशाच एका कारणाने डोंबिवली शहर चर्चाचा विषय ठरला आहे. कारण म्हणजे मुंबईत झालेलं अनलॉक.

मुंबई अनलॉक झाल्यापासून गावी गेलेले अनेक लोक मुंबईत परतले आहेत. सर्रास लोक मुंबई उपनगरात राहातात, डोंबिवली परिसरातील संख्याही जास्त आहे. हे सगळे लोक काम करण्यासाठी मुंबईत येतात.

या सगळ्यांची कामं जरी सुरु झाली असली, तरी या सगळ्यांना मुंबई उपनगर बससेवा, बेस्ट अशाच पर्यायांचा वापर करुन मुंबईत यावं लागतं. मात्र त्यापासून होणारा त्रास भयंकर आहे, असं इथले प्रवासी सांगतात. सकाळी 10 वाजता कामावर हजर राहायचं असेल, तर डोंबवलीकरांना सकाळी ठिक 4 ते 4.30 वाजता बस स्टँडवर यावं लागतं.

दादर, करीरोड, मुंबई सेंट्रल, मंत्रालय अशा भागांमध्ये काम करणारे अनेक लोक बस स्टॉपवर तात्कळत उभे असतात. डोंबिवलीवरून अनेक बस ठाण्याकडे जात असतात. त्यामुळे अनेक डोंबिवली ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास अनेकांना करावा लागतोय.

या सगळ्याला डोंबिवलीकर वैतागले आहेत. डोंबिवली फास्ट ज्यावेळेला पटरीवरती धावायची, त्यावेळेस अनेक डोंबिवलीकर दारावर लटकुन का होईना, पण ऑफिसमधला त्रास विसरुन जात असत, मात्र आता ऑफिसला पोहोचण्याआधीच अनेकांना बसमधून लटकून प्रवास करावा लागतो.

घरची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाचा सांभाळ, वैवहारिक जीवन या सगळ्यांचा ताळमेळ बसवायचा असेल, तर हा पदरी पडलेला त्रासदेखील सहन करावा लागेल, याच एका भावनेने अनेक लोक प्रवासाला लागले आहेत. एक दिवस मरायचंच आहे, मग ते चेंगरा चेंगरीने असो की कोरोना होऊन, अशादेखील भावना अनेकांच्या ऐकताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहात नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments