एकदम जुनं

मुंबादेवीमुळे मायानगरीला मुंबई असे नाव ? पहा काय खर, काय खोटं !

गोरगरिबाची, श्रीमंतांची आणि सर्वांचीच स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई, मायानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या याच मायानगरीचा इतिहास फार कमी जणांना माहीत असतो.

गोरगरिबाची, श्रीमंतांची आणि सर्वांचीच स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई, मायानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या याच मायानगरीचा इतिहास फार कमी जणांना माहीत असतो. आज वंटास मुंबईच्या खास रिपोर्ट मध्ये मायानगरीच्या या शहराला मुंबई हे नाव कसे पडले व ज्याच्यामुळे पडले त्याचा इतिहास काय याबद्दल माहिती घेणार आहोत.

मायानगरीला मुंबई हे नाव कसे मिळाले ?

मायानगरी मुंबईचा इतिहास फार जुना आहे. अनेक संशोधक, इतिहासकार मुंबईचा वेगवेगळा इतिहास सांगत असतात. परंतु, फार कमी लोकांनी मुंबईच्या नावाचा इतिहास जगासमोर आणला. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईचे नाव ज्या देवीवरुन तयार झाले त्या मुंबादेवीचा इंतिहास रंजक आहे. आताच्या दक्षिण मुंबईत भुलेश्वर परिसरातल्या मुंबादेवी मंदिराच्या नावावरून मायानगरीला मुंबई असे नाव पडले. मच्छीमारांनी स्थापन केलेल्या मुंबादेवीवरुन शहराला मुंबई असे नाव पडले. “मुंबा आणि आई” यातून मुंबई या शब्दाचा जन्म झाला. इंग्रजांच्या काळात मुंबईला बंबई आणि बॉम्बे या दोन नावांनी नव्याने ओळखू लागले. इंग्रज गेले तरी शहराची जुनी नावंच कायम होती. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली. यानंतर 1995 मध्ये शहराचे नाव सर्व भाषांमध्ये मुंबई असे वापरण्याचा निर्णय झाला.

मुंबादेवी मंदिराचा खरा इतिहास

जवळपास 400 वर्षांचा जुना इतिहास असणारे हे मुंबादेवी मंदिर, 1737 मध्ये मेंजिस नावाच्या ठिकाणी होते. म्हणजेच आजचे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सांगताना, मुंबादेवी मंदिराची स्थापना मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी म्हणजेच कोळी बांधव केली होती असे सांगितले जाते. ही देवी आपल्या मुंबईचे आणि भक्तांचे समुद्रापासून रक्षण करेल असा विश्वास मच्छीमारांना वाटत होता. 1737च्या काळात आपल्या देशावर वर्चस्व करीत असलेल्या इंग्रजांनी मंदिराचे आताच्या मरिन लाइन्स पूर्व येथील बाजारपेठेच्या परिसरात स्थलांतर केले. स्थलांतरांनंतर मंदिरामुळे बाजारात गर्दी वाढू लागली.

देवीचे दर्शन घेतल्यानंतर दिवस चांगला जातो या भावनेने बाजारातील व्यावसायिक आणि ग्राहक देवीचे दर्शन घेऊ लागले. लोकांच्या मनात देवीबद्दल अपार भक्तिभाव वाढू लागला, ते देवीसमोर नवस करू लागले आणि इच्छापूर्ती झाल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. यातून मंदिरातील रोजची गर्दी वाढत गेली.

1737 च्या दशकात, मुंबादेवीच्या भवती तीन भव्य तलाव होते. परंतु त्या वेळी मुंबईची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत होती. लोकांची वर्दळ वाढत होती, जागेची टंचाई निर्माण होत होती. ही जागेची पीडा दूर करण्यासाठी इंग्रजांनी मंदिराचे स्थलांतर करताना तलाव बुजवले आणि तेथे जमीन तयार करण्यात आली ज्याचा उपयोग मुंबई शहरीकरणाचा झाला.

मंदिराच्या देखभाली विषयी माहिती

जेव्हा इंग्रजांच्या काळात मुंबादेवी मंदिराचे स्थलांतर करण्याचा निर्णय झाला त्यावेळी भक्त पांडूशेठ यांनी स्वतःची जमीन दिली होती आणि स्थलांतर झाल्यानंतर अनेक वर्षे मंदिराची देखभाल पांडू शेठ यांचे कुटुंब करत होते. मात्र कालांतराने मुंबई उच्च न्यायालयाने “मंदिराची देखभाल एका ट्रस्टद्वारे केली जाईल” असा निकाल दिला. पुढे जाऊन, ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात नारिंगी रंगाच्या मुंबादेवीच्या शेजारी अन्नपूर्णा आणि जगदंबा देवीच्या मूर्तीची स्थापना केली.

अर्थातच, वंटास मुंबईच्या या खास रिपोर्ट मधून आपल्याला मायानागरीला मुंबई असे नाव का पडले याची माहिती मिळालीच असेल, वंटास मुंबई असाच मुंबईच्या विषयांना धरून घडामोडी, बातम्या व इतिहास आपल्या वाचकांसाठी घेऊन येत असते. आपल्यालाही अश्याच काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आम्हाला कॉमेंट्स द्वारे जरूर कळवा आम्ही ते तुमच्या पर्यंत पोहचवणे आमचे आद्यकर्तव्य समजू !

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments