आपलं शहर

मुंबईला भूकंपाचे ईशारे, लक्ष द्या नाहीतर घडेल 1618 सारखी घटना…

भूकंपाच्या अनेक घटनांना जवळून अनुभवणारी मुंबई आजवर खंबीर उभी आहे. मुंबईच्याच लगत असलेल्या महामुंबईला देखील अनेक भूकंपाचे अनुभव आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबईजवळ असलेल्या पालघर सारख्या ठिकाणी भूकंपाचे वारंवार धक्के बसत आहेत. सध्या कोरोना संकटाच्या काळात, 5 सप्टेंबर रोजी पालघरला तब्बल तीन वेळा भूकंपाचे हलके धक्के बसले आहेत. त्यामुळे, कोरोनासह या भूकंपाच्या इशाराला गांभीर्याने घेऊन योग्य त्या उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे.

मुंबईतील सगळ्यात मोठा भूकंप

सण 1618, म्हणजेच सतराव्या शतकाच्या आसपास मुंबईत मोठा भूकंप झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्या भूकंपात जवळपास 20 हजार जणांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद आहे. आजवरचा हा मुंबईतील सर्वात मोठा मनुष्यहानी झालेला भूकंप मानला जातो. भूकंप झाल्यानंतर त्याचा परिणाम दूर अंतरावर देखील जाणवत असतो. असच काहीसं घडलं 1993 ला, लातूर जिल्ह्यात भूकंप झाला आणि चटके बसले दूरवर मुंबईला तसेच, 2001 मध्ये भुजमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्केही मुंबईत जाणवले होते.

नुकताच मुंबईला भूकंपाचा इशारा

मुंबई परिसरातील पालघर येथे मागील अनेक वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसले आहेत. आणि नुकतेच शनिवारी देखील हलक्या भूकंपाचा धक्का पुन्हा पालघरने पोटात घातला. पालघर सोबतच पनवेल परिसरालाही सक्रिय भूकंप क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्याचा परिणाम पूर्व उपनगरांमध्ये होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे, कारण मुंबईच्या परिसरातील भूकंप रेषा पालघर जवळून जाते.

2017 मध्ये मुंबई महापालिकेने भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय (ITI) मुंबईच्या तज्ञ प्राध्यापकांसोबत मुंबईतील भूकंपाबाबत अभ्यास केला होता. मुंबईतील पूर्व उपनगरांना भूकंपाचा अधिक धोका असल्याचे त्या अभ्यासात आढळून आले. पनवेलमध्ये सक्रिय भूकंप रेषा असून ती कोपरखैरणेपासून भिवंडीपर्यंत जाते. त्यात मुंबईतील शिवाजी नगर, गोवंडी, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, पवई, भांडुप आणि मुलुंडला भूकंपाचा धोका पोहचू शकतो, असे आढळून आले होते. दक्षिण मुंबईला याचा कमी धोका असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुंबईच्या पोटात जे बदल सध्या सुरू आहेत, त्यामुळे मोठी घटना घडली तट नंतर आश्चर्य मानायला नको.

(Earthquake warnings to Mumbai, pay attention otherwise events like 1618 will happen)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments