फेमस

वकील मानेशिंदेंची 10 लाख रुपये फी रिया चक्रवर्ती कशी देणार? पहा कमाई आणि खर्च

बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री नेहमी लाईम लाईटमध्ये असतात. कुणी चांगल्या कामासाठी प्रसिद्ध होतं, तर कुणाची बदनामी होत असते. असच काहीसं चित्र सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणातून ऐक्ट्रेस रिया चक्रवर्तीच्या बाबतीत होताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर रियाच्या प्रॉपेटी वरून अनेक चर्चांना उधाण येत आहे. त्यातच आपली बाजू मांडण्यासाठी महागडे वकील सतीश मानेशिंदे यांना कसे हायर केले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक प्रकारचे रियासंदर्भात मिम्स व्हायरल होत आहेत. नक्की, तिच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तिची महिन्याची इन्कम किती आहे आणि कोणत्या बेसेस वर तिने इतक्या महागड्या वकिलांना हायर केलं याच संदर्भातला आजचा वंटास मुंबईचा हा खास रिपोर्ट…

रियाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याआधी तिची संपूर्ण पार्श्वभूमी आपण पाहूया. रियाचा जन्म 1 जुलै 1992, बंगलोरमध्ये झाला होता. ती सध्या 28 वर्षांची आहे. रियाचे वडील पेशाने आर्मी ऑफिसर असल्याकारणाने तिने शिक्षण पंजाबमधील अंबाला आर्मी पब्लिक स्कूल मधून केले. शालेय शिक्षण पूर्ण करताच तिने शिक्षणाला टाटा बायबाय केले. रियाने पुढे जाऊन 2009 मधून तिच्या अॅक्टिंग करिअरला सुरवात केली. एमटीव्ही (MTV) मधील स्कूटी तीन दिवा या सीरिअल मधून तिने एंट्री केली. 2012 मध्ये पहिली तेलगू मुव्ही डेबू करत 2013 मध्ये ‘मेरे डॅड की मारुती’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 2014 मध्ये सोनाली केबल तर 2018 मध्ये जलेबी अशा मुव्हीमध्ये तिने काम केले.

राखी सावंतपासून रिया चक्रवर्तीपर्यंत वकील सतीश मानेशिंदे यांची गाजलेली प्रकरणे…

रियाची एकूण कमाई
सोर्सेस नुसार, रिया चक्रवर्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपये आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच सन 2017-18 आणि 2018-19 या वर्षात रिया चक्रवर्तीने सुमारे 18 लाखांची कमाई केली आहे. त्यातच रिया चक्रवर्तीचा पगार 2019 मध्ये 9 लाख रुपये वाढला आहे. याव्यतिरिक्त रिया अनेक मॉडेलिंग फॅशन शो मध्ये हिस्सा घेत असते, त्याचे तिला लाखो रुपये मिळत असतात. परंतु, याचा उल्लेख ती तिच्या वार्षिक उत्पन्नात करत नसल्याचे सांगितले जाते.

रिया ही वेल नोन ब्रँड अभिनेत्री नव्हती, त्यामुळे तिच्याकडे जाहिरातींचे ऑफर फार कमी प्रमाणात येत असत. रिया चक्रवर्ती हिने खार पूर्व येथे जवळपास 75 लाख रुपयांचे घर खरेदी केले, ज्याचे डाऊन पेमेंट 25 लाख दिले, तर बाकी बँक मधून कर्ज काढून देण्यात आल्याचे तिने सांगितले आहे. याव्यतिरिक्त रिया काही प्रोजेक्टमध्ये भागीदारीने काम करायची, ज्याचे तिला थोड्या फार प्रमाणात पैसे मिळत असत.

रियाची एकूण कमाई ही बाकी अभिनेत्रींच्या तुलनेत फारशी चांगली नाही. रिया ही एक स्ट्रगल करणारी अभिनेत्री होती, जिचे करिअर आता बॉलीवूड मधून संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारण फक्त एकच, खुद्द तिचा बॉयफ्रेंड सुशांतसिंग राजपूत. आता रिया ही प्रेक्षकांकडून इतकी बदनाम झाली आहे की, पुढे जाऊन तिला आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणते काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही. यातच, सतीश मानेशिंदे सारखे दिवसाला 10 लाख रुपये फी घेणारे वकील हायर केल्यामुळे आर्थिक बाबींना धरून तिच्यावर आणखी प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments