फेमस

बॉलीवूडमधील हे कलाकारही करतात ड्रगचे सेवन; रियाचा धक्कादायक खुलासा

” हम तो डूबे है सनम, तुम्हे भी लेके डूबेंगे ” अशीच काहीशी परिस्थिती सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग संदर्भात अटक झालेल्या रिया चक्रवर्ती हिची झालेली पहायला मिळत आहे. सध्या ड्रग प्रकरणात अटक झालेली रिया भायखळा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. नुकतेच, चौकशी दरम्यान रियाने बी-टाऊनच्या बड्या कलाकारांची ड्रग प्रकरणी नावे घेतली असल्याचा खुलासा झाला आहे. याआधी, मुंबई विशेष न्यायालयाने सुशांतच्या मृत्यूच्या तपासाचा भाग म्हणून ‘एन.सी.बी’ने दाखल केलेल्या ड्रग्ज-संबंधी प्रकरणातील अभिनेत्री रिया, तिचा भाऊ शोविक आणि इतर चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळला होता.

‘सी.बी.आय.’ने केलेल्या चौकशीत रिया चक्रवर्ती हीच्या डिलिट केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्या. त्यातून ड्रग अँगल उदयास आल्यानंतर सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला एक वेगळंच वळण लागले. पुढे जाऊन NCB (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने तपास सुरू केला आणि सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग संदर्भात रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, दिपेश सावंत आणि काही ड्रग्ज पेडलर्सला अटक केली.

जेल मध्ये असलेल्या रियाने चौकशी दरम्यान मोठ्या अभिनेत्रींसह जवळपास 25 अधिक नावांचा खुलासा केला आहे. यामध्ये, अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खांबट्टा, सुशांतचा मित्र, माजी मॅनेजर रोहिणी अय्यर आणि चित्रपट निर्माते मुकेश छाबरा ड्रग पदार्थांचे सेवन करतात अशी कबुली, रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय तपास यंत्रणेसमोर दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी साराने 2018 मध्ये ‘केदारनाथ’मध्ये सुशांतसिंग राजपूत सोबत डेब्यू केला होता. तसेच, ‘केदारनाथ’ शूटिंगदरम्यान सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात होते असा दावा सुशांतचा मित्र सॅम्युएल हौकिप याने केला होता. दुसरीकडे, स्वतः रियाने आपल्या कबुलीजबाबात एनसीबीला, सारा अली खान, सुशांतसिंग राजपूत आणि इतर मित्र थायलंडला गेले होते असेही सांगितले होते. त्यामुळे, सारा अली खानचे ड्रग प्रकरणात रियाचे काढलेले नाव सिद्ध होते की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

तसेच, रियाच्या अटकेआधी एनसीबीशी केलेल्या चौकशी दरम्यान रियाने बॉलिवूड सेलिब्रिटींची काही नावे उघडकीस आणली होती, जी ड्रग्जचे सेवन करतात आणि त्यांची खरेदी करतात. तब्बल 15 बी-टाऊनर्स आता एनसीबी रडारवर आहेत आणि असेही कळले आहे की ते कलाकारांच्या बी-श्रेणीतील आहेत. रियाच्या म्हणण्यानुसार, बॉलिवूडमधील 80 टक्के स्टार ड्रग्जवर आहेत. आता, ड्रग्जच्या तपासणीत एनसीबी 25 बॉलिवूड स्टार्सना समन्स बजावणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबईतील 94 हजार 851 अनधिकृत बांधकामापौकी फक्त एकावर कारवाई?

ज्या मुंबईवरून वाद निर्माण झालाय ती बाबासाहेबांनी महाराष्ट्राला कशी मिळवली ?

(ब्लॉग) सत्तेचा माज की शक्तीप्रदर्शन?

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments