आपलं शहर

महाराष्ट्रात दिवाळी नंतरच वाजणार शाळेची घंटा, शिक्षण मंत्र्यांनी दिले संकेत

मार्च महिन्यात कोरोनाला महाराष्ट्रात सुरू झाली अगदी तेव्हापासूनच महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. त्यानंतर विध्यार्थ्यांच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या. पुनश्च हरी ओम म्हणत राज्य सरकारने अनेक गोष्टींवर शिथिलता आणली परंतु शाळे बाबत सरकारने कोणतेही ठोस पावले उचललि नाहीत. केंद्राने जरी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी महाराष्ट्रात कोरोनाचा पादुर्भाव पाहता राज्य सरकार महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यास अनुकूल नाही. राज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याचे संकेत शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

केंद्र सरकारने 21 सप्टेंबर पासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष भरवण्याची मुभा दिली असली तरी, राज्यात किमान नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबर पासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करता येतील का? याबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड राज्याचे सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेश्मा अग्रवाल यांच्या शिक्षण विभागातील विविध अधिकारी व शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरू करण्याबाबत नुकतेच जाहीर केलं असून त्याबाबत एसओपी देखील जाहीर केली आहे. परंतु राज्यातील वाढती कोरोनाची रुग्ण संख्या बघता 21 सप्टेंबर पासून शाळा सुरू करणे योग्य नाहीत अशी भूमिकाही ऑनलाइन बैठकीत संस्थाचालकांनी मांडली आहे. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. संस्थाचालकांनी महामंडळाच्या मागणीची दखल घेऊन 21 सप्टेंबर पासून कोणती शाळा सुरू होणार नसल्याचे यावेळी शिक्षण मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments