खूप काही

Inside The Crime | पत्नीच्या प्रियकराचा खून करून पोलीसांसमोर हजर राहाणाऱ्या रुस्तमची कहानी…

काही वर्षांपुर्वी अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ सिनेमा आला होता. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून ज्यावेळेला ही घटना घडली होती, त्यावेळेस संपूर्ण देश हादरला होता.1959 मध्ये विवाहबाह्य संबंधातील या हत्येची कहाणी सत्तेच्या कॉरिडॉरपासून सैन्य बॅरेक्सपर्यंत होती. पारसी तरूण कवास मानेकशॉ नानावटी नौदलात कमांडर होते. ते आपल्या सुंदर पत्नी आणि तीन मुलांसोबत खूप आनंदित होते. एकदा ते सुट्टीवर घरी पोहोचले, मात्र त्यांना घरी आल्यावर अशी गोष्ट समजली, जी कोणासोबतही होऊ नये. ती घटना अशी होती की त्यांची पत्नी सेल्विया परपुरषाच्या प्रेमात पडली होती. पत्नीकडून झालेल्या या गोष्टीमुळे ते खूप नाराज झाले होते, मात्र काही दिवसांनी पत्नीनेही या गोष्टीचा खुलासा त्यांच्यासमोर केला होता. प्रेम आहुजा हा एक सिंधी तरुण व्यापारी होता. ता आठवड्यातील जास्तीत जास्त दिवस पार्ट्या करत असे आणि त्या पार्ट्यांना त्याच्या व्यापारी मित्रांना बोलावत असे. त्याचं राहानीमानही इतकं जबरदस्त होतं की कोणतीही तरुणी त्याच्याकडे लवकर आकर्षित होईल. याच्या प्रकरणात नानावटींची पत्नीही त्याच्या मोहात अडकली, आणि जे गरजेचं नव्हतं, तेच झालं. अखेर नानावटींनी स्वत:हून त्यांच्या दोघांच्या लग्नाबद्दल विचार आपल्या पत्नीसमोर मांडला. यावर त्यांची बायको शांत होती, नानावटी पण तिच्या मनात काय चालू आहे, ते समजू शकत नव्हते. एके दिवशी नानावटींनी आपल्या बायकोला चित्रपट बघायला पाठवून दिले आणि ते सरळ प्रेम आहुजाच्या घरी गेले. तिथे प्रेम आणि नानावटी यांच्यात वाद झाला, तीन गोळ्या उडाल्या, त्यात प्रेम आहुजाचा मृत्यू झाला आणि नानावटींनी थेट पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले.
ही गोष्टी इथेच संपली नाही, तर इथून पुढे खरी गोष्ट घडली.
कवास मानेकशॉ नानावटी – नौदलात काम करणारा पारसी नानावटी हे नौदलाचे एक हुशार अधिकारी होते. ब्रिटनच्या रॉयल नेव्ही कॉलेजचे विद्यार्थी नानावटी हे आयएनएस म्हैसूरचे सेकेंड इन कमांड होते. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी त्यांनी अनेक नेतृत्व केली आहेत, तर ब्रिटनने त्यांना अनेक शौर्य पुरस्कारानेही सन्मानित केले होते. ब्रिटिश भारत सोडून जात असतानाही लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्यांचे कौतुक केले होते. असे म्हटले जाते की पांढर्‍या वर्दीत नानावटी इतके सुंदर दिसतात की त्यांच्यावर कितीतरी मुली फिदा होतील. याचं उदाहरण म्हणजे त्यांनी केलेल्या खूनाची केस सुरू असताना ते जेव्हा कोर्टामध्ये येत असत, तेव्हा अनेक स्त्रीया फक्त त्यांना पाहण्यासाठी कोर्टाबाहेर जमलेल्या असायच्या. प्रेम आहुजा – श्रीमंत सिंधी उद्योगपती श्रीमंत, सुंदर, लहरी, कुरळे केस, पार्ट्यांची शान आणि एका कार शोरूमचा मालक, प्रेम आहुजा याने बर्‍याच महिलांना आपल्या प्रेमात अडकवलं होतं आणि त्यांना सोडूनही दिलं होतं. त्याने नानावटी यांची पत्नी, सेल्वियाशीही प्रेमसंबंध जोडले होते. पण त्याला साल्वियाशी लग्न करायचे नव्हते. सेल्व्हियानेही अनेकदा प्रेम आहुजासोबत लग्न करण्यास नकार दिला होता, असे मत त्यांच्या वकीलाने कोर्टात सादर केले होते. सेल्वियाचा संपुर्ण समाज जरी या प्रसंगात तिच्यासोबत असला तरी त्यावेळेस सर्वात फेमस वृत्तपत्र BLITZ (बीएलआयटीझेड) या वृत्तपत्राने बरेच काही त्या प्रकरणाबद्दल प्रकाशित केले होते. त्यामुळे सेल्व्हियावर असलेला संशय अजून मोठ्याप्रमाणात बळावत होता. सेल्व्हिया – प्रेमाच्या मधोमध उभी असलेली स्त्री सेल्व्हियाकडे सर्व काही होते. पती, मुले, कुटुंब आणि पैसा परंतु कदाचित तिच्या आयुष्यात एकटेपणा देखील असायचा. ज्यावर ती मात करताना हारली होती. तिने पतीपासून काहीही लपवले नाही, त्याच्यात पती जवळ नसताना झालेले विवाहबाह्य संबंधदेखील तीने उघडपणे सांगून टाकले. इंग्रजी वंशाची असलेली सेल्वियाचे नानावटीवर प्रेम होते, पण तिचा नवरा अनेक महिने जहाजात राहात असे, मुले जन्माला आल्यानंतर त्यांच्यातील अंतर आणखीनच वाढले होते. नानावटीला तिच्या प्रेमाबद्दल विचारले असता ती लपून राहिली नाही. सांगितले की तिचे आहुजावर प्रेम आहे; पण जेव्हा नानावटीने प्रेमसोबतच्या लग्नाचे विचारल्यावर ती गप्प बसली. आपल्या विवाहबाह्य प्रेमाबद्दल नवऱ्यााला कळल्यानंतर काय होणार याची कल्पना तिने केली नव्हती. त्यादिवशी काय घडलं? मेट्रो सिनेमात नानावटीने सेल्व्हीया आणि मुलांना सोडले. मॅटीनी शो पाहाण्याचं सगळ्यांचं ठरलं होतं, त्यानंतर त्यांनी बॉम्बे हार्बर गाठले, त्यांच्या कॅप्टनकडून बंदूक व गोळ्या घेतल्या आणि त्याने युनिव्हर्सल मोटर्स हे शोरूम गाठलं. या शोरूमचा मालक प्रेम आहूजा होता. तिथे गेल्यावर समजलं की आहुजा त्याच्या फ्लॅटवर होता, तो त्याच्या घरी पोहोचला. आहूजा आंघोळ करत होता, त्याच्या नोकराने नानावटीला हॉलमध्ये वाट पाहाण्यास सांगितले. मात्र नानावटी थेट त्याच्या बेडरूममध्ये गेला. काही मिनिटांचा दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अचानक तीनवेळा गोळी झाडल्याचा आवाज नोकराला आला. फक्त टॉवेल घातलेला आहुजा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नानावटी घरातून बाहेर पडला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांना देखील या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. असं म्हणतात की याप्रकरणी पहिल्यांदाच मीडिया ट्रायल झाली होती. (BLITZ) बीएलआयटीझेड नावाच्या वृत्तपत्राचे पारसी संपादक व्ही. के. करंजिया हे खुलेपणाने नानावटींच्या बाजूने बातम्या छापत होते. असे म्हणतात की 25 पैशांचे हे वृत्तपत्र त्याकाळी 2 रुपयांपर्यंत विकले गेले होते आणि त्याचे बुकिंग एक दिवस अगोदर केले गेले होते. नानावटी आणि करंजिया दोघेही पारशी असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच संपादकाने नानावटींना प्राधान्य दिले, अशाही बातम्या त्यानंतर समोर आल्या होत्या. नानावटींच्या बाजूने निर्णय जूरीने नानावटी प्रकरणाची सुनावणी केली होती. निर्णायक मंडळामध्ये 9 लोक होते, नानवटींच्या बाजूने आठ जण आणि विरोधी पक्षात एक. या प्रकरणानंतरच ज्युरी सिस्टम खचली गेली. असे म्हटले जाते की ज्युरीच्या लोकांचा प्रसार माध्यम आणि कोर्टाबाहेर असलेल्या जनतेवर परिणाम झाला. निर्णायक मंडळाने नानावटींच्या बाजूने निकाल दिला आणि नंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पाठवले. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले जिथून नानावटींना तुरूंगात पाठविण्यात आले. मात्र काही दिवसांनंतर त्यांना सोडण्यातदेखील आले. असे म्हणतात की नानावटी हे व्हीके कृष्णा मेनन यांचे निकटवर्तीय होते आणि मेनन हे नेहरू यांचे निकटवर्तीय होते. त्यावेळेस पंडील नेहरू यांची बहीण विजय लक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या आणि म्हणून या प्रकरणातल्या सर्व गोष्टी नानावटींच्या बाजूने घजत होत्या. अखेरीस, सुटकेनंतर नानावटी आपल्या संपुर्ण कुटुंबासह कॅनडाला गेले. 2003 मध्ये त्यांचे निधन झाले.41467278182 big

हेही वाचलत का…

Inside The Crime |01| ती, अचानक तिच्या मागे कसलातरी स्पर्श झाला, ती थबकली आणि… Inside The Crime |02| अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर आज तो पुन्हा आला होता; परत कोणाची तरी साडी जाळणार होता… Inside The Crime |03| बायकोने साखर नाही दिली आणि एचडीएफसी बँकेच्या चेअरमनचा खूण झाला… Inside The Crime | 04 | सीटखालच्या रक्त लागलेल्या रुमालमुळे सिध्दार्थ संघवीच्या खून्याचा शोध लागला… Inside The Crime |05| शोध 23 वर्षे न सापडलेल्या घराचा… Inside The Crime| 23 वर्ष न सापडलेल्या घराचा शोध अखेर 32 दिवसात लागाला…!

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments