कारण

“महाराष्ट्रात झालं, बिहारमध्ये नको”, फडणवीसांना भाजप नेत्याचा सल्ला…

देशात राजकारण म्हटलं तर महाराष्ट्राचं नावं सर्वात आधी येतं, कारण याचं राज्याने देशाच्या राजकारणात अनेक नेत्यांची भर घातली आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या बिहार निवडणूकीचं नेतृत्वदेखील भाजपकडून महाराष्ट्रातील अनुभवी नेत्याकडे देण्यात आलं आहे.

राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत्या बिहार निवडणूकीची जबाबदारी सोपवली आहे. यावरच भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात जसे पाडापाडीचे राजकारण झाले तसे बिहारमध्ये होऊ नये. बिहारमध्ये आमचं म्हणजेच नितिश कुमारांचं सरकार येणार, असं मत खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे.

बिहारमध्ये फडणवीसांना जबाबदारी दिलेली आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी नितीश कुमार आहेत, त्यामुळे भाजपचं सरकार येईल, अशी मी अपेक्षा करतो, पण महाराष्ट्रात जे झालं, तसं त्या ठिकाणी याला पाडायचं, त्याला पाडायचं, याचं तिकीट कापायचं, त्याचं तिकीट कापायचं, असे प्रकार घडू नयेत, अशी मी अपेक्षा करतो, असे मत एकनाथ खडसे यांनी मांडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात खडाजंगी होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यात एकनाथ खडसे यांच्याकडून अनेक वार केले जात आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पलटवले जात आहेत. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वाटेत येणारे सगळे काटे दूर करण्याचा प्रयत्न केला, असे आरोपदेखील एकनाथ खडसे यांनी काहीदा केले आहेत. तर 2019 च्या विधानसभा निवडणूकीत माझ्या लेकीचा (पंकजा मुंडे) परावभ भाजपच्या नेत्यांमुळेच झाला, असे आरोप देखील त्यांनी केले आहेत, त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणाची सुत्र कशाप्रकारे फिरतात हे पाहाणे गरजेचे आहे.

बिहारची निवडणुकीत फडणवीस का?
महाराष्ट्रात 2019 मध्ये जे सत्ता नाट्य झालं, त्याची सगळी सुत्र देवेंद्र फडणवीसांच्या हातात होती. इतकच काय तर महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे 105 आमदार निवडणून आले होते, याचे श्रेयही भाजपने देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. त्यामुळे राजकारणातले खाचखळगे जाणून घेणारे आणि अभ्यासू राजकीय नेतृत्व म्हणून भाजपमध्ये फडणवीसांकडे पाहिलं जातं. या विचारांचा आधार घेऊन बिहारची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे सोपली गेलेय, असं म्हटलं जातं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments