आपलं शहर

आज कंगना रानौत होणार POK मध्ये दाखल?

3 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12.27 मिनीटांनी कंगना रनौतने एक ट्विट केलं. ज्यात असं म्हटलं आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळत आहे. मुंबई आता पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा सवाल तिने तिच्या ट्विटमधून केला आहे. या सगळ्यानंतर मुंबईवर प्रेम करणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी, सामान्य मुंबईकरांनीही तिच्यावर संताप व्यक्त केला.

यानंतर अनेक कलाकारांनी कंगनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तर काहींही तिला मुंबईबद्दल महत्व समजून सांगितलं. मुंबईने अनेकांना खूप काही शिकवलय. अनेकांना जगवलय, मुंबई आणि महाराष्ट्राने जगाला अनेक गोष्टी दिल्यात, मात्र कंगनाला हे कदाचित आतापर्यंत समजल नाही.

कंगनाने मुंबईवर वक्तव्य केल्यानंतर लगेचच ती मुंबईकडे रवाना होणार आहे. देशात कुठेही फिरण्याच्या असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधारे कंगनाने हे वक्तव्य केलं. शिवसेना नेते संजय राऊत यांना केंद्रस्थानी घेत तीने आतापर्यंत सगळी वक्तव्य केली असली, तरी त्यात मुंबईचा मुद्दा हा मुंबईत राहाणाऱ्या अनेक मुंबईकरांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे फक्त शिवसेनाच नाही, तर हजारो मुंबईकरांनी तिच्यावर टिका करण्यास सुरुवात केली आहे.

हे सगळं असूनदेखील पाकव्याप्त वाटणाऱ्या काश्मिरमध्ये ती आज येत आहे. तिच्यासोबत केंद्राने पुरवलेली Y+ सुरक्षा असणार आहे. कंगना जरी मुंबईत आली, तरी सरकारी नियमांनुसार तीला 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे, असे आदेश मुंबई महानगर पालिकेने घोषित केले आहेत. त्यामुळे मुंबईच्या आस्मितेचा सांभाळ करणाऱ्यांसोबतच येत्या काळात मुंबईला POK म्हणणारे आणखी किती जन्माला येतात, हेच पाहाणे गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments