खूप काही

KKR vs MI : IPL 2020 मधील कोलकाता विरुध्द मुंबई, असे असतील प्लेइंग XI

कोलकाता नाईट रायडर्स आपला पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्ससोबत खेळण्यास सज्ज झाला आहे. मुंबईचा हा दुसरा सामना असताना पहिल्याच सामन्यात या संघाचा चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाला आहे. अशा परिस्थितीत रो’हिट’ संघ केकेआरविरुद्धच्या चांगल्या विक्रमासाठीच नव्हे तर शेवटच्या सामन्यातून घेतलेल्या धड्यांमधूनही नवीन काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करतील. हा सामना अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे.

शेवटच्या सामन्यात क्रुणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर असे गोलंदाज यांचा परिणाम तितकासा जाणवून आला नाही, मात्र मुंबईच्या ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन यांनी मुंबईला सावरलं होतं.

मुंबईसमोर अडचण अशी आहे की दुखापतीनंतर हार्दिक पंड्याने केलेली फलंदाजी. मोठ्या ब्रेकनंतर पंड्याकडून अनेक अपेक्षा संघाने वर्तवल्या होत्या. मात्र तितक्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

दुसरीकडे, केकेआरचा संघ कर्णधार दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन आणि आंद्रे रसेल यांच्या भरवशावर नवे बदल करण्यास सज्ज असेल. फलंदाजीसाठी सलामीच्या वेळी सुनील नरेनसोबत तरुण शुभमन गिल येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या मोसमात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू आहे.

दोन्ही संघातील प्लेइंग अकरा पुढीलप्रमाणे असू शकतात-

मुंबई इंडियंस – रोहित शर्मा (c), क्विंटन डी कॉक (wk), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी / इशान किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कूल्टर-नाइल / जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

कोलकाता नाइट राइडर्स – दिनेश कार्तिक (c, wk), सुनील नरेन, शुभमन गिल, नितीश राणा, इयोन मोर्गन, आंद्रे रसेल, पैट कमिंस, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी / संदीप वारियर, शिवम मावी, प्रदीश कृष्णा

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments