फेमस

Lata Mangeshkar : लतादीदी सांगतात, “आयुष्यात ते करायचं राहून गेलं”…

आज गानसम्राज्ञी, भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचा 91 वा वाढदिवस आहे. जगाच्या पाठीवर एक यशस्वी गायीका म्हणून लतादीदींची ओळख आहे. वडीलांचे बोट धरून सुरु केलेला प्रवासाला लतादीदींनी चार चांद लावले, असच म्हणावे लागेल.

गायनाच्या प्रवसात लतादीदींनी अनेक संकटांशी सामना केला. त्यातच लहान वयाच आलेली कुटुंबाची जबाबदारी, अशा अनेक गोष्टींमुळे लतादीदींनी आपलं वयक्तीक आयुष्य फार कमी अनुभवलं. काही दिवसांपूर्वी बीबीसी एशिया नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत लतादीदींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्यांचं लग्न.

लतादीदींनी अद्याप लग्न का नाही केलं, असा प्रश्न अनेकांना सुचत असतो. मात्र त्याचं उत्तर प्रत्येकाला समजत नाही. त्या मुलाखतीत लतादीदींनी याचं प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्या म्हणतात की वयाच्या पाचव्या वर्षापासून माझा गाण्याचा प्रवास सुरु झाला. वडीलांना त्या वयापासून माझ्याकडून रियाज करून घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर माझ्या कामांमध्ये वाढ होत गेली.

वयाची वाढ होत गेली, तशी अंगावर जबाबदाऱ्या येत गेल्या. वडीलानंतरही घरातील प्रत्येकाला सांभाळायची जबाबदारी माझ्यावर होती. बहिणींची लग्न झाली, त्यानंतर त्यांची मुलं, या सगळ्यात माझं करिअर, अशा अनेक कारणांमुळे माझ्या लग्नाचा विचार राहून गेला. लतादीदी म्हणतात की हे सगळं करत असताना अनेकांनी माझ्यासमोर लग्नाचा विषयदेखील काढला होता, माझ्या मनातदेखील अनेकदा लग्नाचा विचार येत असे, तरीही मी लग्न करू शकले नाही.

माझ्यावर असलेल्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर लग्न करेन, मात्र दिवसेंदिवस वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि लग्न राहून गेलं. लतादीदी म्हणतात की एखादी जबाबदारी पार पाडत असताना अनेक त्रास सहन करावे लागतातच, पण या सगळ्यामुळे मी कठोर कधीच झाले नाही. भावंडांचा योग्य सांभाळ करणे, हे माझं पहिलं कर्तव्य होतं, अशा त्या सांगतात.
(Lata Mangeshkar turns 91: The nightingale, with 25,000 songs in over seven decades, is a gift that keeps giving)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments