आपलं शहर

Mumbai Corona : 132 जणांचा मृत्यू: तरी पालिकेची फक्त 6 जणांच्या घरच्यांना मदत

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून देशासह मुंबईत कोरोनाचा फैलाव सुरू व्हायला सुरुवात झाली. यावेळी मुंबईत महापालिका प्रशासन सज्ज होऊन काम करत होते. 22 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या काळात महापालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत होते. सर्व लोक घरी असताना कोरोना रुग्णांची काळजी घेणे, रुग्णालयात साफ सफाई करणे याकडे हे कर्मचारी लक्ष देत होते.

वेळोवेळी मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केली, मात्र वेतन मिळाल नाही. काम करत असताना मुंबई पालिकेतील 2 हजार 588 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले, तर त्यामुळे 132 जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारच्या नियमानुसार मृतांच्या परिवाराला 50 लाख नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे परंतु महापालिकेने केवळ 6 मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली असून बाकी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आहे.

कोरोणामुळे मुंबई महापालिकेतील 132 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 107 चतुर्थ श्रेणीतील आहेत. बाधितांमध्ये घनकचरा विभागातील कामगारांची संख्या अधिक आहे.

कोरोनाच्या संकटात पालिकेच्या 2 हजार 588 कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला असुन यामध्ये एक सहायक आयुक्त आणि एक उपायुक्तांचा मृत्यू झाला आहे. पालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रतिबंधित क्षेत्र, स्थानिक भागात कोरोनाच्या संबंधित सर्व कामे करत आहेत, गरजूंना अन्न पुरवणे, कोरोना केंद्राचे व्यवस्थापन यासह अनेक प्रकारची कामे कर्मचारी करत आहे.

आतापर्यंत सहा कर्मचाऱ्यांना मदत?
राज्य सरकारच्या नियमानुसार कोरोणामुळे मृत कर्मचारी यांच्या वारसांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र आतापर्यंत फक्त सहा मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळाली असाल्याचा दावा म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी केला आहे. यावर आम्ही पालिकेतील अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्ताधारी अधिकाऱ्यांनी याविषयी बोलणं टाळलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments