आपलं शहर

हुश्श! मुंबईकरांचे पुढच्या वर्षापर्यंतचे पाण्याचे संकट मिटले…

मुंबईकर कोरोनाच्या महामारीचा सामना करत असताना मुंबईकरांभोवती पाण्याच्या संकटाचे संकट घोंघावत होतं, परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांचे हे संकट संपुष्टात आले आहे.

ऑगस्टमधील दमदार पावसामुळे मुंबईकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर झालं आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव काठोकाठ भरले असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 14 लाख 19 हजार म्हणजे 98 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षभर पाण्याची समस्या उदभवणार नाही. यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै कोरडे गेल्याने मुंबईवरील पाणीटंचाईचे संकट ओढावले होते. टंचाईमुळे 20 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने टंचाई दूर होण्याचे संकेत मिळू लागले होते. 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या सर्व सात तलावांमध्ये जुलै अखेरपर्यंत जेमतेम चार लाख दशलक्ष लिटर इतकेच पाणी शिल्लक राहिले होते. त्यामुळे पालिकेला संपूर्ण मुंबईत पाणीकपात करावी लागली होती.

मुंबईतील धरण क्षेत्रातील पाणीसाठा
अप्पर वैतरणा 96.81 टक्के
मोडकसागर 100 टक्के
तानसा 99.58 टक्के
मध्य वैतरणा 96.95 टक्के
भातसा 97.97 टक्के
तुळशी 100 टक्के
विहार 100 टक्के

एकूण पाणीसाठा 98.04 टक्के

ऑगस्टमध्ये 20 ते 25 दिवस जोरदार पाऊस पडला या पावसामुळे सर्व तलाव काठोकाठ भरले आहेत. मुंबईला दररोज सर्वाधिक म्हणजे 1 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव 98 टक्के भरला आहे. मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी हे चार तलाव गेल्या महिन्यातच ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने टप्याटप्याने पाणी कपात रद्द केली आहे. पालिकेने पाच सप्टेंबरला पाण्याचा आढावा घेतला असता, तलावात 14 लाखांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा येणारे वर्षभर पुरेल इतका आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नाही.

हेही वाचाच…

Mumbai Corona : 132 जणांचा मृत्यू: तरी पालिकेची फक्त 6 जणांच्या घच्यांना मदत

लॉकडाऊनंतर मुंबईत झालेले आणि होत असलेले सगळ्यात मोठे बदल…

मुंबईकरांनो अभिनंदन! तुमचं वर्षभर पाणी कपातीचं टेंशन गेलं…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments