आपलं शहर

आयपीएल 2020 मध्ये भारताचा एकही खेळाडू करोडपती नाही…

इंडियन प्रीमियर लीगला (IPL) सुरुवात झाली आहे. यावर्षीची आयपीएल भारतात होत नाही, हे भारतीयांसाठी एक नाराजीची गोष्ट आहे. कोरोनामुळे दुबईमध्ये आयपीएल होत असून पहिला सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये झाला. चेन्नईने आपले विजयाचे खाते खोलले, तर मुंबईला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

आयपीएल एप्रिल महिन्यात सुरू होणार होती, परंतु कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली आणि आता दुबईत होत आहे. यंदा 2020 आयपीएलसाठी डिसेंबर 2019 मध्ये लिलाव करण्यात आला होता.

आयपीएलच्या लिलावात दरवर्षी खेळाडूंना मोठी रक्कम दिली जाते. दरवर्षी लिलाव केला जातो व खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक टीमची चढाओढ आपण पाहतो. यंदादेखील असेच चित्र पाहायला मिळाले. भारतात 2008 साली आयपीएलची सुरवात झाली तेव्हापासून लिलावात करोडो रुपये टीम मालक खेळाडू खरेदीसाठी पटलावर लावतात. भारताची आयपीएल असली तरी या वर्षी टॉप 5 करोड रुपयांमध्ये एकही भारताचा खेळाडू नाही ही एक खेदाची बाब आहे.

हे आहेत IPL 2020 मधील टॉप 5 करोडपती

1. पॅट कमिन्स (केकेआर, 15.5 कोटी)

2. ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब, 10.75 कोटी)

3. क्रिस मॉरिस (आरसीबी, 10 कोटी)

4. शेल्डन कोटरेल (किंग्ज इलेव्हन पंजाब, 8.5 कोटी)

5. नॅथन कोल्टर-नाईल (मुंबई इंडियन्स, 8 कोटी)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments