आपलं शहर

मुंबईतील 94 हजार 851 अनधिकृत बांधकामापौकी फक्त एकावर कारवाई?

कंगनाचे पाली हिल येथील कार्यालय पालिकेने अनधिकृत म्हणून जमीनदोस्त केले आणि यामुळे कंगना अजून संतप्त झाली. पालिकेने कंगणाच्या बांधकामावर कारवाई तर केली, पण मुंबईत सर्रास असे अनधिकृत बांधकामाकडे पालिका प्रशासन का दुर्लक्ष करत असा प्रश्न निर्माण होतो. (Out of 94 thousand 851 unauthorized constructions in Mumbai, action was taken against only one?)

मुंबई पालिकेचा क्षेत्रात मुंबई महानगरपालिकानी दिलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे की, मुंबईत बेकायदेशीर इमारती ही मोठी समस्या आहे. दरवर्षी हजारो बेकायदेशीर इमारती बांधून महापालिकेचे भ्रष्ट अधिकाऱ्यांची एकमताने बांधकाम केले जात आहे. बेकायदेशीर बांधकाम टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु बेकायदेशीर बांधकाम हे जसेच्या-तसे आहे. याच बेकायदेशीर बांधकामामुळे अनेक मुंबईकरांना जीव गमवावा लागला आहे. कमला मिल कॉम्पउंड, भानु फरसान मार्ट, होटल सिटी किनारा, हुसैनी बिल्डिंग (भिन्डी बाज़ार), साई सिद्धि बिल्डिंग (घाटकोपर), कैसर बाग बिल्डिंग डोंगरी, अपघातामुळे शेकडो मुंबईकरांचा जीव गेला आहे.बीए

अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन तक्रार प्रणाली 1 मार्च 2016 पासून 8 जुलै 2019 पर्यंत एकूण 94हजार 851 तक्रारीऐवजी फक्त 5 हजार 461 अनधिकृत बांधकामावर कार्यवाही झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंते यांनी दिली आहे.

सध्या मुंबईत अशी चर्चा आहे की शिवसेनेच्या बदलेच्या भावनाने अभिनेत्री कंगना राणावतच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली, पण मुंबईत लाखो अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी करणार? तसेच मुंबई महानगरपालिका पोलीस बंदोबस्त तसेच इतर साधनांनवर प्रत्येक वर्षी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करतात. परंतु बेकायदेशीर बांधकाम / इमारतीवर कारवाई बरोबरीने केले जात नाही.

मुंबई महानगरपालिका अवैध बांधकामावर दरवर्षी 15,000 पेक्षा अधिक नोटीस बजावतात, पण 10 ते 20% अवैध बांधकामावर कारवाई केली जाते. त्यामुळे केवळ कंगणाचे कार्यालय पाडून पालिकेने काय साध्य केले हा प्रश्न निर्माणच होतो? कंगणाचे कार्यालय पाडून कोणत्या मुंबईकराचा जीव वाचणार नव्हता, पण जर मुंबईतील अनधिकृत बांधकामावर वेळीच कारवाई केली असती तर लाखो मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला नसता.

ज्या मुंबईवरून वाद निर्माण झालाय ती बाबासाहेबांनी महाराष्ट्राला कशी मिळवली ?

(Blog) सत्तेचा माज की शक्तीप्रदर्शन?

सरकारकडून आरेला न्याय; मुंबईची 600 एकर जमीन वनक्षेत्र म्हणून घोषित…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments