आपलं शहर

Proud ; भारतातील सर्वाधिक शुद्ध पाणी देणारे शहर, आपली…..

 

जल है तो जीवन है और जल शुद्ध, तो जीवन निरोगी ! आपल्या देशात दरवर्षी एन्व्हारमेंट सर्व्हे केला जातो, त्यात पाण्याच्या शुद्धतेवर देखील चाचणी केली जाते. जागतिक आरोग्य संघटना नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाण्याची शुद्धता तपासून पाहत असते. एकूण पाणीपुरवठयापैकी 5 टक्के पाणी हे अशुद्ध असल्यास ते पिण्यायोग्य ठरते अशी जागतिक आरोग्य संघटनेची शुद्ध पाण्याची व्याख्या आहे. आता संपूर्ण भारतातून सर्वात शुद्ध पाणी कोणत्या शहराला मिळते, पाहुयात…

कोणत्या शहराला मिळते शुद्ध पाणी ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या केंद्रीय विज्ञान आणि पर्यावरण खात्यामार्फत ‘एन्व्हारमेंट सर्व्हे रिपोर्ट-2020’ (Environment Survey Report 2020) नुसार मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात शुद्ध पाणीपुरवठा करणारी ठरली आहे, म्हणजे मुंबई हे शहर देशातुन सर्वाधिक शुद्ध पाणीपुरवठा देते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह विविध सोयीसुविधा पुरवत असते. यात पाण्यासारख्या मूलभूत सुविधेचाही समावेश आहे. मुंबई पालिकेकडून सोसायटी, इमारती, चाळी तसेच झोपडपट्ट्यांचा भाग यातही स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा केला जातो.

मुंबईकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पालिका सर्वोतोपरी खबरदारी घेत असते. मुंबईत एकूण पाणीपुरवठयापैकी केवळ 0.7 टक्के पाणी हे अशुद्ध आहे. या आधी नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारच्या ‘ब्युरो ऑफइंडियन स्टॅडर्ड’ने घेतलेल्या देशव्यापी पाण्याच्या नमुन्यात मुंबईचे पाणी देशभरात स्वच्छ आणि शुद्ध असल्याचे आढळले होते.

आपली मुंबई महानगरपालिका नेहमीच पाण्याच्या शुद्धतेबाबत अगदी जबाबदारीने आणि काटेकोरपणे काम करत आली आहे. यात भांडुप जलप्रकल्प, पांजरपोळ, तुळशी, विहार यासह 27 तलाव आणि 350 केंद्रांमधून शुद्धतेचे नमुने वेळोवेळी घेतले जातात. मुख्य म्हणजे, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी, विहार या मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात प्रमुख तलावांच्या पाण्याचे शुद्धता दर एक तासाने तपासले जातात. त्याचबरोबर वॉर्ड स्तरावर पाण्यातील क्लोरीनचे प्रमाणही तपासले जाते. हे प्रमाण प्रमाणित केलेल्या स्तरापेक्षा कमी आढळले तर त्यात क्लोरीनची मात्रा वाढवून ते प्रमाण योग्य केले जाते.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments