आपलं शहर

POK च्या प्रकरणात पडून राज ठाकरे यांना भाजपला दुखवायचं नव्हतं?

गेल्या काही दिवसांपासून कंगना रानौतने मुंबईला pok म्हणून हिनवले, तरीही राज ठाकरे गप्प का, असा सवाल अनेक माध्यमांतून आणि मुंबईकरांकडूनही विचरला जात आहे. मात्र राज ठाकरे यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. याचं नेमकं कारण काय, हे अद्याप कोणालाच समजू शकलं नाही. मात्र यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यावेळेला मनसेने मुंबईतील परप्रांतियांविरुध्द आवाज उठवला होता, त्यावेळेस शिवसेना गप्प का होती, याचं उत्तर आम्हाला अद्याप मिळालेलं नाही. ज्यावेळेस पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घालण्यावर मनसेने आवाज उठवला, त्यावेळेस शिवसेनेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ज्यावेळेस मनसे एकटी होती, त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता, असा सवाल संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना मांडला आहे. हे माझं वयक्तिक मत आहे, पक्षाची भुमिका खुद्द राज ठाकरे व्यक्त करतील, असं म्हणायला ते विसरले नाहीत.

या मुद्दावर बीबीसी मराठीशी बोलताना जेष्ठ पत्रकार सचिन परब म्हणतात की भविष्यात मनसे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे कंगनाच्या मुद्दात हात घालून मनसे भाजपला नाराज करणार नाही. कंगनाला विरोध म्हणजे कंगनाच्या बाजूने असलेल्या भाजपला विरोध केल्याप्रमाणे आहे. भाजपचे नेते अशिष शेलार हे अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर जाताना माध्यमांना दिसले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात मुंबईतील निवडणुकांमध्ये किंवा इतर ठिकाणी भाजप आणि मनसे एकत्र लढल्यास आश्चर्य व्यक्त करायला नको.

अनेक मुंबईकरांना किंवा जे लोक मनसे आणि शिवसेना एकत्र यावी यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना असंदेखील वाटलं होतं, की या मुद्यावर शिवसेना आणि मनसे एकत्र येतील, मात्र तसं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळे कंगनाचा मुद्दा राज ठाकरे यांना क्षुल्लक वाटतो की मनसेला शिवसेनेला एकटं पाडायचं होतं, हे येणारा काळच सांगेल.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments