फेमस

आपल्या वकीलाबद्दल रियाने सोडलं मौन; तर वकील जगजाहीर करण्यास देतायेत नकार

मुंबईत सुरू असणारी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला संपूर्ण देशभरातून प्रतिसाद उमटत आहेत. सी. बी. आय (Crime Beauro Investigation), ईडी (Enforcement Director) आणि आता एन. सी. बी. (Narcotics Control Beauro) देखील या प्रकरणात कसून चौकशी करताना दिसत आहेत. सुशांग सिंगची हत्या की आत्महत्या; या बद्दल तपास करताना या तपासला एक वेगळेच वळण लागले आणि हा तपास सध्या ड्रगस (Drugs) च्या एका वेगळ्याच ट्रॅक्ट वरती जाऊन पोहचला. याआधी रिया चक्रवर्ती हिच्या आर्थिक बाजूंबाबत आणि तिचे वकील सतीश मानेशिंदे यांना हायर केल्याबद्दल, सोबतच त्यांची फि किती असेल यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. नुकत्याच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रियाने काही तिच्या बाजूच्या बाबी मांडल्या होत्या.

रिया कुठून देते फीस
“मी माझ्या घरासाठी 17000 हप्ता महिन्याला कुठून भरू हा माझ्यापुढे प्रश्न आहे” हे रियाचे मुलाखती मधील उद्गार प्रचंड व्हायरल झाले. हे ऐकून, सुशांतच्या बहिणीने तिला विचारले की जर तुझ्याकडे 17 हजार रुपये नाहीत? तर एवढा महागडा वकील कुठून मिळवलास? त्याच मुलाखतीत रियाने सतीश मानेशिंदे तिच्यासाठी मोफत काम करत आहेत, असंही सांगितलं होत. दिवसाला 10 लाख रुपये फी आकारणारा वकील फुकटात कसे काय काम करेल, अशा चर्चांना उधाण आले होते. यावर आता माने शिंदे यांनी मौन सोडले असून, आपल्या फिस बाबतदेखील खुलासा केला आहे.

वकील मानेशिंदेंची 10 लाख रुपये फी रिया चक्रवर्ती कशी देणार? पहा कमाई आणि खर्च

यावर सतीश मानेशिंदेचं उत्तर काय?
“दहा वर्षांपूर्वीचे लेख वाचून फीस कोणीही ठरवू नये,” असे ते म्हणाले आहेत. “मी कोणासाठीही मोफत काम करत नाही. परंतु, फीस हा माझा आणि माझ्या क्लायंट मधला वैयक्तिक प्रश्न असून, मी असा तो बाहेर चर्चा म्हणून बोलू इच्छित नाही.” असेही ते म्हणाले. “इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जेव्हा मला याबद्दल प्रश्न करेल तेव्हा मी त्यांना उत्तर द्यायला बांधील आहे” असे बोलून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

सध्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा आढावा घेतला तर, ड्रगस प्रकरणात रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि स्यामुअल मिरांडा यांना सप्टेंबर 7 पर्यंत अटक करण्यात आली आहे. जवळपास 14 दिवस उलटून गेले असले तरी सी बी आय अजून प्रकरणाचा छडा लावू शकली नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments