आपलं शहर

संजय राऊत यांचा केंद्रातल्या भाजपला सगळ्यात मोठा धक्का

सध्या संपूर्ण देशात बिहारच्या निवडणुकांचं वारं फिरत आहे, त्यामुळे देशात कोरोनापेक्षाही राजकारणाच्या बातम्यांनी वेग धरला आहे. त्यातच अजून एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एनडीए सरकारमधून शिवसेना आणि अकाली हे दोन प्रमुख पक्ष बाहेर पडले आहेत, त्यामुळे याचा परिणाम केंद्रातल्या भाजप सरकारवर पडण्याची शक्यता आहे.

या सगळ्यावर संजय राऊत यांनीदेखील मोठं विधान केलं आहे. ज्या युतीत शिवसेना आणि अकाली दल नाहीत, त्या युतीला मी एनडीए मानत नाही. एनडीएचे मजबूत आधारस्तंभ म्हणजे शिवसेना आणि अकाली दल होते. शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडायला भाजपने भाग पाडलं, आता अकाली दलानेही भाजपची साथ सोडली. एनडीएला आता नवीन भागीदार मिळाले आहेत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा. असं मत संजय राऊत यांनी मांडलं आहे.

संजय राऊत यांचे हे विधान देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर समोर आले आहे. ते म्हणाले की मी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही विषयांवर चर्चा केली. ते माजी मुख्यमंत्री आहेत. याशिवाय महाराष्ट्रात विरोधी पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आपल्यात वैचारिक फरक असू शकतात, परंतु आम्ही शत्रू नाही. सीएम उद्धव ठाकरे यांना आमच्या भेटीची माहिती होती.

यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीला राजकीय महत्त्व नाही. संजय राऊत यांना ‘सामना’ साठी माझी मुलाखत घ्यायची होती आणि त्यासाठी आम्ही भेटलो होतो. सत्ता स्थापनेसाठी आम्ही शिवसेनेशी चर्चा करत नाही.

या सगळ्यावरून हे स्पष्ट आहे की, शिरोमणी अकाली दलाने कृषी विधेयकाच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सह 22 वर्ष जुने संबंध तोडले आहेत. तर याच वर्षी शिवसेनेने एनडीएला रामराम केला होता, त्यामुळे भविष्यात केंद्रात काय घडामोडी घडणार आहेत, हे पाहाणे गरजेचे असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments