आपलं शहर

मुंबईत पुन्हा कलम 144 लागू! काय आहे कलम 144 जाणून घ्या?

 

मुंबईत आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत कलम 144 म्हणजे संचारबंदी ही 30 सप्टेंबर पर्यंत लागू असणार आहे. मुंबईत कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना दिवसेंदिवस अक्राळ विक्राळ रूप धारण करत असून याच पाश्र्वभूमीवर कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

IMG 20200917 195226

काय आहे कलम 144?
  • कलम 144 हे CRPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात.
  • एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात.
  • सोप्या शब्दात सांगायचं तर, जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं. या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणतात.
  • जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.
  • कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते.
  • अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
  • कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकतात. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते.
  • कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
  • या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments