आपलं शहर

मोदींच्या कारकीर्दीत मोदींना टक्कर देणारा एकमेव शेतकरी नेता…

आज मोदींचा 70 वा वाढदिवस. मोदींचा प्रवास भारतीयांना थोड्याफार प्रमाणात माहीत आहे. सुरवातीला चहा विकणारे मोदी पंतप्रधान झाले अशी भावना संपूर्ण भारतीयांच्या मनात आहे. चाय वाला देश चालवतोय अशी देखील चर्चा होत असते. मोदींचा प्रवास चायवाला, संघाचे स्वयंसेवक, गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान असा आहे. प्रवास अनेकांनी अनुभवलेला देखील आहे. 2014 ची निवडूक असताना भाजप पक्ष श्रेष्टीना पंतप्रधान पदाचा उमेदवार मिळत नसताना राज ठाकरे यांनी गुजरात दौरा केला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला सुचवलं होत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान उमेदवारासाठी योग्य आहेत. तेव्हापासून मोदींच्या नावाची चर्चा सूरु झाली. मोदी 2014 साली पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदींनी तेव्हा पासून आपल्या हातात देशाचे सूत्र हाती घेतली आणि देशाचा गाडा हाकायला सुरुवात केली. मोदींना मुख्यमंत्री काळात आणि पंतप्रधान काळात त्यांच्याच पक्षातील खूप कमी लोक आहेत जे मोदींच्या विरोधात बोलले असतील. त्यापैकीच एक म्हणजे सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले.

गोष्ट आहे 2016 ची…
देशात 2016 साली जीएसटी लागू करण्यात आला होता. त्याबद्दल आपल्या पक्षातल्या खासदारांचे मत जाणून घेण्यासाठी मोदींनी दिल्लीत पंतप्रधान निवास मध्ये बैठक बोलावली. या बैठकीत मोदींनी जीएसटी बद्दल आपलं म्हणणं मांडलं, खासदारांना काही प्रश्न आहेत का विचारलं होत अचानक एक हात वर आला सगळ्यांनी बघितलं तर ते होते भाजपचे भंडारा-गोंदिया चे खासदार नाना पटोले. मोदींनी त्यांना विचारा अशी हाताने खून केली. नाना पटोले आपली शंका विचारली हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, सर्वजण नानांकडे पाहायला लागले. त्यांना कळलं पंतप्रधानांना आपला प्रश्न आवडलेला नाही त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. तेवढयात मोदी उच्चारले आता तुम्ही मला शिकवणार का?

त्यानंतर ही बैठक संपवण्यात आली. नरेंद्र मोदींनी उलट प्रश्न विचारायचा नाही असा भाजपचा एक अलिखित नियम नाना पटोले यांनी मोडला हे स्पष्ट होतं. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागेल हे दिसत होतं. बाकी खासदारांनी आपण त्यांच्यासोबत नाही हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील इतर खाजगी त्यांच्यापासून दूर उभे राहिले. केवळ ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नानांना समजावले येथे प्रश्न विचारणाऱ्यांचा घरी बोलावून अपमान केला जातो. भाजपमध्ये मोदी आणि शहा म्हणजे देशातील हुकूमशाही चालवत आहेत असा आवाज उठवणारे देशातील पहिले शेतकरी नेते आहेत.

हेही वाचाच…

Birthday Special | पंतप्रधान मोदींजींचा खडतर जीवनप्रवास !

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments