आपलं शहर

मोठी बातमी! CSMT स्थानकाचा कायापालट होणार; अदानी, टाटा कंपनी प्रकल्पासाठी तयार

आयकॉनिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) इमारतीच्या मेगा पुनर्विकासासाठी आज (शुक्रवारी, 26 सप्टेंबर) ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत तब्बल 43 संभाव्य कंपनींनी उपस्थिती दर्शवली होती. ज्या कंपनी या बांधकामाचं काम आपल्या कंपनीला मिळवण्यास उत्सुक असतील.

CSMT Redevelopment 0118

मुंबई सीएसएमटीच्या युनेस्को-सूचीबद्ध वर्ल्ड हेरिटेज साइटच्या पुनर्विकासाच्या मेगा प्रकल्पाला शुक्रवारी नितीयोग सीईओ आणि रेल्वे बोर्डाच्या प्रमुखांसह प्रमुख विकासक आणि आर्किटेक्टच्या बैठकीला सुरुवात झाली.

1bmCSMTnewcol

1888 मध्ये 16 लाख रुपये खर्च करून बनवलेल्या या इमारतीचे 100 हून अधिक वर्षानंतर पुन:बांधकाम होणार आहे. यावेळेस 1, 642 कोटी रुपये इतकी अंदाजित रक्कम वर्तण्यात आली आहे. ‘भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ’ (The Indian Railways Station Development Corporation) ही या प्रकल्पाची नोडल एजन्सी आहे.

CSMT Redevelopment 0124

पुनर्विकासाची योजना मुंबई सीएसएमटीला 1930 च्या दशकातल्या इमारतीप्रमाणे बनवण्याचा मानस आहे आणि या रेल्वे स्थानकास जगातल्या सगळ्यात बेस्ट स्थानकाप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब बनविण्यासाठी विविध पद्धतींचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. या बांधकामाला चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सीएसएमटी, वाडी बंदर आणि भायखळा असे मिळून तब्बल 25 लाख चौरस फुट इतके रिअल इस्टेट क्षेत्र असणार आहे.

CSMT Redevelopment 0115

या बैठकीमध्ये अदानी ग्रुप, टाटा प्रोजेक्ट लि., एल्डेको, जीएमआर ग्रुप, जेकेबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., एसएनसीएफ हब आणि कॉन्सेक्शन्स, आय स्क्वेअर कॅपिटल, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लि., ऐस अर्बन डेव्हलपर, जीआर इन्फ्रास्ट्रक्चर, एस्सेल ग्रुप, लार्सन आणि टुब्रो. आर्किटेक्चरल संस्था बीडीपी सिंगापूर, हाफिज कंत्राटदार, एईसीएम, फंड हाऊस अँकरगेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज लि., ब्रूकफिल्ड आणि जेएलएल, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, केपीएमजी, पीडब्ल्यूसी इंडिया, ईवाय, आणि ब्रिटीश हाय कमिशन या बड्या आणि इतर छोट्या कंपन्या उपस्थित होत्या. इन्व्हेस्ट इंडिया ही राष्ट्रीय गुंतवणूकीची जाहिरात आणि सुविधा एजन्सीदेखील या बैठकीला उपस्थित होती.

CSMT Redevelopment 0117

त्यामुळे लवकरच जगप्रसिध्द असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा नवा लूक आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments